घरमहाराष्ट्रनाशिकभालेकर मैदानावर पुन्हा गणेशोत्सवाचा जल्लोष

भालेकर मैदानावर पुन्हा गणेशोत्सवाचा जल्लोष

Subscribe

यी समिती सभापती उद्धव निमसे यांनी दाखवला हिरवा कंदील; गणेश मंडळांकडून घेणार हमीपत्र

गणेशोत्सवाची परंपरा असलेल्या बी. डी. भालेकर हायस्कूल मैदानावर यंदा देखावे उभे करण्यास स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र, तत्पूर्वी संबंधित मंडळांकडून स्मार्ट पार्किंगचे नुकसान होणार नाही, असे हमीपत्र घेण्याचे त्यांनी प्रशासनाला आदेशित केले.

गेल्या ४० ते ५० वर्षांपासूनची परंपरा असलेल्या बी.डी.भालेकर मैदानावर यंदाच्या वर्षी स्मार्ट पार्किंग विकसित केल्यामुळे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेने परवानगी नाकारली आहे. यासंदर्भात तेथील गणेशोत्सव मंडळाने काही दिवसांपूर्वी महापालिकेतील विविध पदाधिकार्‍यांसह आयुक्तांची भेट घेतली होती. मंडळाकडून महापालिकेच्या सर्व अटी- शर्तींचे पालन करण्यात येईल व कोणत्याही प्रकारचे स्मार्ट पार्किंगचे नुकसान होऊ दिले जाणार नाही, असे सांगण्यात आले. शुक्रवारी (ता. ९) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत हा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यास मंजुरी देतानाच पार्किंगचे नुकसान होणार नाही याचे हमीपत्र घेण्याचे आदेशित करण्यात आले. या निर्णयामुळे महिंद्रा सोनाचे पद्माकर गावंडे, राजे छत्रपतीचे गणेश बर्वे, सचिन रत्ने, एचएलचे महेश पगारे, नरहरी राजाचे विजय बिरारी, मूक बधीर असोसिएशनचे सुशांत गालफाडे, यशवंतचे निखील परदेशी, मायकोचे संजय पाटील, महिंद्राचे पोपटराव देवरे आदी पदाधिकार्‍यांनी आनंद व्यक्त केला आहे.

- Advertisement -

सेन्सरला अडथळा नसेल तर परवानगी

गणेशोत्सवाच्या परवानग्या घेण्यासाठी मंडळांना महापालिकेच्या खेटा माराव्या लागणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे आदेश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. संदीप नलावडे यांना दिले आहेत. महापालिका, पोलीस आणि ‘एमएसईबी’ची संयुक्त एक खिडकी योजना विभागीय कार्यालयांत सुरू करण्याचा विचार सुरू असून संबंधित प्रक्रियेला गती देण्याचेही त्यांनी आदेशित केले. भालेकर मैदानावरील पार्किंगमधील सेन्सरला अडथळा होणार नसेल तर तेथे देखावे उभे करू देण्यास आमची हरकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -