घरमहाराष्ट्रनाशिकजुलैच्या पहिल्या आठवड्यात पालिकेची बससेवा होणार सुरू

जुलैच्या पहिल्या आठवड्यात पालिकेची बससेवा होणार सुरू

Subscribe

आढावा बैठकीत आयुक्तांचा निर्णय; सेवेसंदर्भात ९० टक्के काम पूर्णत्वास

कोरोनाचा प्रभाव ओसरल्याने आता महापालिकेच्या शहर बससेवा सुरू करण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून ही सेवा सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी शुक्रवारी (दि. ११) दिली. बससेवेसंदर्भात झालेल्या बैठकीत आयुक्त बोलत होते. बससेवेच्या अनुषंगाने बांधकाम, गॅस, पुरवठा, मोबाईल याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. ही सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने ९० टक्के काम पूर्ण होत आले असून तपोवन आणि नाशिक रोड येथील डेपोचे काम पूर्णत्वाकडे आहे. २७ जून ते ३० जून या दरम्यान बसेस सुरू करण्याच्या दृष्टीने ट्रायल घेण्यात येणार आहे. आढावा बैठकीस शहर अभियंता संजय घुगे, कार्यकारी अभियंता एस. एम. चव्हाणके, कार्यकारी उदय धर्माधिकारी, बाजीराव माळी, मिलिंद बंड, वसंत गायधनी, रणजीत ढाकणे आदी उपस्थित होते.

तपोवन, नाशिकरोड डेपोत शॉपिंग मॉल

नाशिक महानगरपालिकेचे उत्पन्नवाढीच्या दृष्टीने तपोवन आणि नाशिकरोड डेपोच्या आवारात शॉपिंग मॉल उभारण्याची योजना विचाराधीन असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

वायनरी, बोटक्लबपर्यंत भविष्यात धावणार बसेस

सिटी बस संदर्भातील अहवालानुसार हाय पेईंग मार्गावर या बस धावणार आहेत. भविष्यात शहर बसबरोबरच ओझर विमानतळ, त्रंबकेश्वर, कसारा लोकलला जोडणारी बससेवा सुरू करण्याचा नियोजन केले जाणार आहे. त्याचबरोबर नाशिक दर्शनसारखे पर्यटनस्थळांवर व सुला वाईन, बोट क्लब आदी ठिकाणी रूट तयार करून बस सुरू करण्याचा विचार आहे.

या नऊ मार्गांवर धावतील बस..

पालिकेच्या वतीने पहिल्या टप्प्यात ५० बसेस सुरू करण्याचा प्रयत्न आहे. या बसेससाठी ९ मार्ग निश्चित करण्यात आले असून त्यावर २४० बसेस धावतील. या बसेसचे मार्ग पुढील प्रमाणे असतील.

  • तपोवन ते बारदान फाटामार्गे सिव्हिल, सातपूर, अशोकनगर, श्रमिकनगर
  • तपोवन सिंबॉयसीस, कॉलेज मार्गे पवन नगर, उत्तम नगर
  • तपोवन ते पाथर्डी गाव मार्गे द्वारका, नागजी, इंदिरानगर, वनवैभव
  • सिंबॉयसीस कॉलेज ते बोरगड मार्गे शिवाजी चौक, लेखा नगर, महामार्ग, मसरूळ, बोरगड
  • तपोवन ते भगूरमार्गे शालिमार, द्वारका, बिटको, देवळाली कॅम्प
  • नाशिकरोड ते बारदान फाटा मार्गे द्वारका, कॉलेजरोड, सातपूर, व्हीआयपी, कार्बन नाका
  • नाशिकरोड ते अंबड गावमार्गे द्वारका, लेखानगर, गरवारे
  • नाशिकरोड ते निमाणीमार्गे जेल टाकी, सैलानी बाबा, नांदूर गाव, नांदूर नाका, तपोवन
  • नाशिकरोड ते तपोवन मार्गे बिटको, द्वारका, शालिमार, सीबीएस, पंचवटी

    Ayukta Kailas Jadhavजुलैच्या पहिल्या आठवड्या पासून ही बस सेवा सुरू करण्यासाठी आजवरच्या कामकाजाचा येत्या २५ जूनला सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. याबसेससाठी नियुक्त होणारे कंडक्टर आणि चालकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. येत्या पंधरा दिवसात उर्वरित लोकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
    -कैलास जाधव, पालिका आयुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -