घरमहाराष्ट्रनाशिकनुसतेच बसू नका, थकबाकी वसूल करा

नुसतेच बसू नका, थकबाकी वसूल करा

Subscribe

घरपट्टी आणि पाणीपट्टीची मोठी थकबाकी वसूल करण्याचे काम पुढ्यात असतानाही महापालिकेचे कर्मचारी एका जागेवर बसून कामचूकारपणा करत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर आयुक्तांची तंबी

घरपट्टी आणि पाणीपट्टीची मोठी थकबाकी वसूल करण्याचे काम पुढ्यात असतानाही महापालिकेचे कर्मचारी एका जागेवर बसून कामचूकारपणा करत असल्याची बाब आयुक्त राधाकृष्ण गमे यांना पश्चिम आणि पूर्व विभागीय कार्यालयास दिलेल्या भेटीप्रसंगी निदर्शनास आली. पाणीपट्टी वसूल करा आणि थकबाकीदारांचे नळ पुरवठा बंद करा, असे आदेश देतानाच कार्यालयातील अतिरिक्त कर्मचार्‍यांनाही घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी बाहेर पाठवा, असे विभागीय अधिकार्‍यांंना आयुक्तांनी आदेशित केले.

पश्चिम विभागीय कार्यालयाला काही दिवसांपूर्वी आयुक्तांनी भेट दिली होती. त्यावेळी काही कर्मचारी कार्यालयीन जागेवर उपस्थित नसल्याचे त्यांना आढळून आले होते. शिवाय घरपट्टी आणि पाणीपट्टी यापूर्वी दिलेल्या सूचनांनुसार कामकाज चालूच नसल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पूर्व विभागाच्या कार्यालयास आयुक्तांनी भेट दिली. या विभागात घरपट्टी व पाणीपट्टी विभागातील आयुक्तांनी भेट दिली तेव्हा तेथील कर्मचारी बसून होते. तुम्ही काय करता, असा प्रश्न करीत पाणीपट्टी वसूल करा आणि थकबाकीदारांचे नळ पुरवठा बंद करा, असे आदेश देतानाच कार्यालयातील अतिरिक्त कर्मचार्‍यांनाही घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी बाहेर पाठवा, असे विभागीय अधिकार्‍यांंना सांगितले. तसेच प्रत्येक विभागात आवक-जावकसाठी कर्मचारी असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. सर्व विभाग मिळून एकच कर्मचारी ठेवा, असेही आयुक्तांनी बजावले. तसेच संबंधित अधिकार्‍यांना संगणकाचे ज्ञान तर नाहीच, साधा माउसही धरता येत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आयुक्तांनी पूर्व विभागाच्या विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांना खडसावले.

काय आढळले आयुक्तांना विभागीय कार्यालयात

  • विभागीय अधिकार्‍यांच्या संगणकावर पासवर्ड टाकून अन्य कर्मचारी करतात काम.
  • ऑनलाईन प्रणाली कागदावरच राहिल्याने विविध दाखले आणि परवानग्यांसाठी रांगा लागलेल्या होत्या
  • विद्युत विभागातील कर्मचारी वर्ग काम करण्याचे सोडून व्हॉटस अ‍ॅपमध्ये मशगूल होता.
  • विवाह नोंदणी कार्यालयात कर्मचार्‍याच्याऐवजी शिपाई काम करत होता.
  • रेकॉर्ड रूममध्ये पाच ते सहा कर्मचारी एकाचवेळी रेकॉर्ड बघत होते.
  • अनेक दस्ताऐवजांचे डिजीटीलायजेशन झालेले नाही..
  • पूर्व विभागाच्या इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या होत्या.
  • भिंतीवर गवत व पिंपळाचे झाड वाढत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -