घरमहाराष्ट्रनाशिकफडणवीसांच्या होर्डिंग्जवर पालिकेचा हातोडा

फडणवीसांच्या होर्डिंग्जवर पालिकेचा हातोडा

Subscribe

सिटी बस लोकार्पण सोहळा सुरू असतानाच केली कारवाई, अधिकारी भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दीक चकमक

बससेवा लोकार्पण सोहळ्यासाठी नाशिकला आलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी महाकवी कालिदास कलामंदिराच्या प्रवेशद्वारावर भाजपच्या काही पदाधिकार्‍यांनी होर्डिंग्ज लावले होते. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने तत्परतेने हे होर्डिंग्ज कार्यक्रम संपण्यापूर्वीच हटवले. या प्रकाराने प्रवेशद्वारावरील वातावरण चांगलेच तापले होते.

महापालिकेने हे फलक त्वरित लावावेत आणि दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजप पदाधिकार्‍यांनी केले. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौर्‍यावर आले असताना लावलेले स्वागताचे फलक आजही शहरात कायम आहेत. असे असताना केवळ फडणवीसांवरच रोष का, असा सवाल भाजप कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी उपस्थित केला. केवळ पालकमंत्री छगन भुजबळांचे फोटो नसल्याने पालिकेने ही कारवाई केल्याचा आरोप बाळासाहेब पाटील, कुणाल वाघ आणि सचिन कुलकर्णी यांनी केला. तसेच, भाजप कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावरच संताप व्यक्त केला. यावेळी अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यात शाब्दिक चकमकही झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -