Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र नाशिक रस्त्यातील धोकादायक वृक्ष हटवणार

रस्त्यातील धोकादायक वृक्ष हटवणार

वृक्ष प्राधिकरण समितीचा निर्णय; गंगापूर रोड विकास समितीच्या प्रयत्नांना यश

Related Story

- Advertisement -

रस्त्यावरील वृक्षांमुळे अपघात होऊन अनेकांचा बळी गेला आहे. विशेषत: गंगापूर रोड परिसरात समस्येची तीव्रता अधिक आहे. या पार्श्वभूमीवर गंगापूर रोड कृती समितीच्या वतीने आंदोलने करण्यात आली होती. तसेच महापालिका प्रशासनाला जाग यावी म्हणून मानवी साखळी देखील करण्यात आली होती. त्यानंतर आता धोकेदायक वृक्ष हटविण्यास महापालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे.

गंगापूर रोड कृती समितीच्या माध्यमातून नगरसेवक तथा गटनेते विलास शिंदे, तत्कालीन नगरसेवक विक्रांत मते यांच्याकडे मागणी केली. कृती समितीच्या वतीने काशिनाथ गोविंदराव मोरे, सचिन मोरे, डॉ श्याम आष्टेकर, पी. एन. कोठावदे, गोकूळ पाटील, मुरलीधर पाटील, शरद दशपूते, प्रकाश कटपाल आदींनी ४ डिसेंबर २०१९ तसेच २१ डिसेंबर २०१९ला तत्कालीन आयुक्तांची भेट घेतली होती. यावेळी धोकादायक वृक्ष हटवण्याची मागणी करण्यात आली होती. या पाठपुरावर्‍याला यश येवून प्रशासनामार्फत या धोकेदायक वृक्षांचे सर्वेक्षण करुन अपघातास निमंत्रण देणारे वृक्ष काढून घेण्याच्या प्रस्ताव वृक्षप्राधिकरणाच्या सभेत मंजूर करण्यात आला. धोकदायक वृक्ष काढून घेणेबाबत विलास शिंदे यांनी वृक्षप्राधिकरण समितीच्या सदस्यांना देखील वेळोवेळी कल्पना दिलेली असल्याने हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

या प्रमुख रस्त्यांवरील वृक्ष तोडणार..

 • होरायझन स्कूलजवळ – १
 • अंबिका झोपडपट्टी, पेठरोड – १
 • शरदचंद्र मार्केट, पेठरोड – १
 • आरटीओ कार्यालयाजवळ – १
 • पवार लॉन्स, पेठरोड – १
 • नामको हॉस्पिटल, पेठरोड – १
 • काका का ढाबा, दिंडोरीरोड – १
 • रिलायन्स पेट्रोलपंप, दिंडोरीरोड – १
 • सोमेश्वर धबधबा रस्ता – ४
 • गंगापूर गाव, गंगापूररोड – १
 • हॉटेल विश्वास, गंगापूररोड – १
 • भोंसला स्कूल गेट – १
 • गणेश मार्बल, गंगापूर – १
 • नवश्या गणपती टर्निंग पॉइंट – १
 • साई हॉस्पिटल, गंगापूररोड – १
 • विराज बंगला, इंदिरानगर – १
 • केंब्रीज स्कूल, इंदिरानगर – १
 • जॉगिंग ट्रॅक ते साईनाथनगर – २
 • सराफ लॉन्स, इंदिरानगर – १
 • तसेच दिंडोरीरोड, पेठरोड व गंगापूररोड या तीन प्रमुख रस्त्यांवर जवळपास २९ धोकादायक वृक्ष असून ही झाडे तोडून त्यांची पुनर्लागवड करण्याचा निर्णय बैठकीत झाला.

Vilas Shindeगंगापूर रोडच्या रुंदीकरणामुळे काही वृक्ष रस्त्यात आले होते. त्यावर वाहने आदळून अनेक गंभीर अपघात झाले आहेत. त्यात अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. ही बाब लक्षात घेऊन आम्ही गंगापूर रोड कृती समितीच्या माध्यमातून लढा उभा केला होता. या लढ्यास आज यश आल्याने आनंद होत आहे.
– विलास शिंदे, गटनेता, शिवसेना

- Advertisement -

 

K. G. Moreगंगापूर रोडवरील भोसला मिलिटरी कॉलेज, कडलग मळयासमोर, गंगापूर गाव येथील हॉटेल उत्सव, सोमेश्वर धबधबा, गणेश मार्बल, गंगापूर, नवश्या गणपती टर्निंग पाँईट, साई हॉस्पीटल या भागांमध्ये रस्त्यातच असे धोकादायक वृक्ष आहेत. हे वृक्ष हटवण्यासाठी गंगापूर रोड कृती समितीची स्थापना करण्यात आली.
– के. जी. मोरे, वृक्ष प्राधिकरण समिती

- Advertisement -