घरमहाराष्ट्रनाशिकदिव्यांग खेळाडूंना पालिका देणार शिष्यवृत्ती

दिव्यांग खेळाडूंना पालिका देणार शिष्यवृत्ती

Subscribe

दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, यासाठी अशा खेळाडूंना अर्थसाह्य देण्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे.

दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, यासाठी अशा खेळाडूंना अर्थसाह्य देण्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे. यापूर्वी राज्यातील अनेक महापालिकांकडून दिव्यांग खेळाडूंना शिष्यवृत्ती देवून प्रोत्साहित केले जाते. आता याच धर्तीवर नाशिकमध्येही ही योजना लागू करण्यात येणार आहे. २० जूनला महासभेत हा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या निर्देशानुसार दिव्यांगांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी विविध योजनांतून अर्थसाह्य दिले जाते. तसेच प्रत्येक महापालिकेत अपंगांसाठी विशेष निधी राखीव असणे गरजेचे आहे. यानुसार नाशिक महापालिकेत हा निधी राखीव आहे. मध्यंतरीच्या काळात निधीवाटप व विविध योजनांसाठी याचा विनियोग व्यवस्थित केला नसल्याबाबत हरकत नोंदवत आमदार बच्चू कडू यांनी नाशिक महापालिकेत आंदोलन केल्यानंतर या योजनांच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली. त्यानूसार कर्णबधीरांना सर्जरीसाठी, दिव्यांगांना स्वयंरोजगार, प्रौढ बेरोजगार दिव्यांगांना अर्थसहाय्य, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांकरिता शिक्षण- प्रशिक्षणाकरिता, दिव्यांगांसाठी शिष्यवृत्ती व व्यवसाय प्रशिक्षणाकरिता, विशिष्ट गरजा असणार्‍या दिव्यांगांना अर्थसहाय्य देणे, मनपा क्षेत्रात काम करणार्‍या संस्था संघटनांचे सक्षमीकरण करणे अशा स्वरुपाच्या योजनांचा समावेश आहे. महापालिकेने सुरू केलेल्या योजनांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना अर्थसाह्य देण्याची योजना सुरू केली आहे. मात्र, दिव्यांग खेळाडूंना शिष्टयवृत्ती दिली जात नव्हती. अनेक खेळाडू दिव्यांगावर मात करत जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावर विशेष प्रावीण्य मिळवतात. तसेच, काही खेळाडू विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवतात. अशा खेळाडूंना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. तसेच, अशा दिव्यांग खेळाडूंची आर्थिक परिस्थिती देखील हलाखीची असते. पैशाअभावी विविध क्रिडा स्पर्धांमध्ये सहभागापासून ते वंचित राहू नये, यासाठी ही योजना प्रस्तावित केली आहे.

- Advertisement -

अशी असेल योजना

प्रथम – १ लाख (आंतरराष्ट्रीय) २५ हजार (राष्ट्रीय), १० हजार (राज्य)
व्दितीय – ७५ हजार (आंतरराष्ट्रीय), २० हजार (राष्ट्रीय), ७ हजार (राज्य)
तृतीय – ५० हजार (आंतरराष्ट्रीय), १५ हजार (राष्ट्रीय), ५ हजार (राज्य)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -