घरमहाराष्ट्रनाशिकपालिकेचे पूर्व विभागीय कार्यालय आता पंडीत कॉलनीत

पालिकेचे पूर्व विभागीय कार्यालय आता पंडीत कॉलनीत

Subscribe

मेनरोडवरील महापालिकेच्या पुरातन दगडी इमारतीला तडा गेल्याने केली उपाययोजना

महापालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालय असलेली मेनरोड येथील इमारतीच्या एका कोपर्‍याला काही महिन्यांपूर्वी तडा गेल्याने ती धोकादायक बनली आहे. परिणामी तेथील कामकाज आता पंडित कॉलनीतील महापालिका इमारतीतून चालणार आहे.

पालिकेने जुन्या इमारतीतील बहुतांश सामुग्री स्थलांतरित केली असून, दोन दिवसांनी संगणकीय लॅनचे काम पूर्ण झाल्यानंतर कर्मचारीही नव्या कार्यालयात दाखल होतील. मेनरोडवर महापालिकेची पुरातन दगडी इमारत आहे. पुरातन वास्तुचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या इमारतीकडे पाहिले जाते. परंतु, या इमारतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून डागडुजीच होऊ शकली नाही. यामुळे पावसाळ्यात दोन महिन्यापूर्वी इमारतीचा मागील काही भाग ढासळला. यामुळे आता खबरदारी म्हणून मनपा प्रशासनाने काही तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना केल्या आहेत. येत्या काळात मनपा व स्मार्ट सिटी कंपनी तसेच पुरातत्त्व विभाग यांच्या संयुक्तरित्या या इमारतीची देखभाल दुरूस्ती केली जाणार आहे. इमारतीचा बराचसा भाग धोकादायक बनल्याने तेथील पूर्व विभागीय कार्यालय स्थलांतरीत करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार पंडित कॉलनीतील मनपाच्या इमारतीत पश्चिम विभागीय कार्यालयाजवळच पूर्व विभागाचे कार्यालय साकारले जाणार आहे. सोमवारी कामकाज करण्याच्या अनुषंगाने फर्निचर व इतर साहित्य स्थलांतरित करण्याच्या कामाला सुरूवात झाली. विभागीय अधिकारी धारणकर यांनीही नुकतीच आपल्या कामकाजास सुरूवात केली. दरम्यान, संगणक तसेच विद्युतीकरणासह काही तांत्रिक कामे दोन दिवसांत पूर्ण झाल्यानंतर सर्वच कर्मचारी व अधिकारी याठिकाणी येऊन आपले कामकाज सुरू करतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -