घरमहाराष्ट्रनाशिकशेतकरी मानधन योजनेला मिळेना लाभार्थी

शेतकरी मानधन योजनेला मिळेना लाभार्थी

Subscribe

तीन दिवसांच्या विशेष मोहिमेत केवळ २३५६ जणांची नोंदणी

पंतप्रधान किसान मानधन योजनेतील अटी-शर्तींमुळे योजनेच्या नोंदणीला लाभार्थी मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील जवळपास १२०० आपलं सरकार नोंदणी केंद्रावर तीन दिवस राबवलेल्या शिबिरांमधून मंगळवार (दि.२७) पर्यंत केवळ २३५६ लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. तरुण शेतकर्‍यांची नावे सात-बारा उतार्‍यावर नसल्यामुळे लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान मानधन योजनेला या महिन्यात प्रारंभ केला. या योजनेत सहभाग घेणार्‍या १८ ते ४० वयोगटातील शेतकर्‍यांना साठ वर्षांनंतर महिन्याला तीन हजार रुपये निवृत्ती वेतन मिळणार आहे. या योजनेनुसार शेतकर्‍यांनी महिन्याला किमान ५५ ते जास्तीत जास्त २०० रुपये ६० वर्षांपर्यंत भरायचे असून त्यानंतर प्रत्येक महिन्याला ३ हजार रुपये निवृत्तीवेतन देण्यात येणार आहे. ही योजना अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांसाठी असून त्यासाठी सातबारा उतार्‍यावर संबंधित शेतकर्‍याचे नाव असणे आवश्यक आहे. सातबारा उतार्‍यावर नाव असणार्‍या एका कुटुंबातील सर्व सदस्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. या योजनेसाठी १८ ते ४० वयोगटातील शेतकर्‍यांची अधिकाधिक नोंदणी व्हावी यासाठी राज्य सरकारने आपलं सेवा केंद्राच्या माध्यमातून २४ ते २६ ऑगस्ट या काळात विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन केले. यासाठी महसूल व कृषी विभागाने संयुक्त मोहीम राबवली. मात्र गावांमध्ये या योजनेत सहभागी होण्यासाठी लाभार्थ्यांची संख्याच कमी असल्याचे आढळून येत आहे. अधिकाधिक शेतकर्‍यांनी या योजनेत सहभागी व्हावे,असे सरकारला वाटत असले, तरी योजनेच्या अटी शर्तींमुळे १८ ते ४० वयोगटातील शेतकर्‍यांच्या नावावर जमिनीच नसल्याने त्यांनी सहभागी व्हायचे तरी कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

तरुण शेतकर्‍यांची नावे नाहीत

नाशिक जिल्ह्यात १२ लाखांवर शेतकरी खातेदार असून त्यातील ८५ टक्के शेतकरी हे अल्प व अत्यल्प भूधारक आहेत. मात्र, या कुटुंबातील केवळ ज्येष्ठ सदस्याचेच नाव जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर आहे. ही योजना केवळ तरुण शेतकर्‍यांसाठीच असल्यामुळे इतरांना त्याचा लाभ घेता नाही. यामुळे योजनेसाठी लाभार्थी मिळत नसल्याचे चित्र आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -