घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमधील निर्बंध आणि वीकेण्ड लॉकडाऊन यापुढेही कायम

नाशिकमधील निर्बंध आणि वीकेण्ड लॉकडाऊन यापुढेही कायम

Subscribe

पालकमंत्री छगन भुजबळांची माहिती, निर्बंध शिथिलतेचा फैसला राज्य सरकारच्या टास्क फोर्सच्या हाती

नाशिक शहरातील निर्बंध आणि वीकेण्ड लॉकडाऊन यापुढेही कायम राहणार आहेत. निर्बंध शिथिल करण्याचा फैसला हा राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या टास्क फोर्सच्या हाती आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर निर्बंध जैसे थेच राहतील, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज सायंकाळी झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. नाशिकमधील कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात असून, शहरात 600, तर जिल्हाभरात १ हजार रुग्ण उपचार घेताहेत. दररोज सरासरी दीडशे रुग्ण बाधित आढळत आहेत. त्यामुळे नाशिकमधील निर्बंध शिथिल करावेत आणि दुकानांच्या वेळांत वाढ करावी, अशी मागणी व्यापार्‍यांकडून केली जातेय. मात्र, तिसर्‍या लाटेच्या भितीने लगेचच निर्बंध शिथील करणं जिल्हा प्रशासनाच्या अंगलट येऊ शकतं. त्यातही निर्णयाचे अधिकार टास्क फोर्सच्या हाती असल्यानं, निर्बंध शिथिलतेसाठी नाशिककरांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -