घरताज्या घडामोडीजिल्हयात यापुढे लॉकडाऊन नाही : पालकमंत्री भुजबळ

जिल्हयात यापुढे लॉकडाऊन नाही : पालकमंत्री भुजबळ

Subscribe

शहरासह जिल्हयात करोना बाधितांची वाढती रूग्णसंख्या पाहता पुन्हा एकदा लॉकडाऊन करावा अशी मागणी विविध पक्षाकडून होत आहे. मात्र गेल्या तीन महीन्यांपासून लोक घरात आहे. संपुर्ण अर्थचक्र थांबले आहे. केवळ गहू, तांदळावर दिवस काढणे कठिण आहे. रूग्णसंख्या वाढली की लॉकडाउन अन रूग्णसंख्या कमी झाली की पुन्हा शिथिलता हा पोरखेळ आता बंद करावा लागेल. त्यामुळे आता नागरिकांना स्वयंशिस्त पाळावीच लागेल. त्यामुळे यापुढे जिल्हयात लॉकडाऊन होणार नाही असे स्पष्ट करतांनाच नागरिकांनी स्वयंशिस्त पाळत दैनंदिन जनजीवन सुरू करावे असे आवाहन जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पालकमंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीप्रसंगी आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर बोलतांना भुजबळ म्हणाले, दर दहा ते पंधरा दिवसातून जिल्हयाचा आढवा घेतला जातो. लॉकडाऊन उठवल्यानंतर परिस्थिती काय असू शकते याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. हे खरंय की, शहरात रूग्णसंख्या वाढते आहे. त्यामुळे या रूग्णांच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये बेड वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हयातील काही सरकारी रूग्णालयांमध्ये करोना रूग्णांसाठी बेड राखीव ठेवण्यात येणार आहे. जागतिक निष्कर्षानूसार रूग्णसंख्या एका विशिष्ट मर्यादेत वाढून पुन्हा ती हळुहळु कमी होते. करोनाचे संकट हे संपुर्ण जगासाठी नवीनच आहे. त्यामुळे हळुहळु अनुभवातून आपण निर्णय घेत आहोत. गेल्या तीन ते चार महीने लॉकडाऊन केल्याने लोक घरातच बसून होते. संपुर्ण अर्थचक्र ठप्प झाले. परंतु कधी ना कधी जनजीवन पुर्वपदावर आणणेही आवश्यक आहे. लोकांना आता आर्थिक चणचण भासते आहे. अर्थचक्राचा गाडाही पुन्हा रूळावर येणेही महत्वाचे आहे. अर्थचक्र सुरू झाले तरच लोकांकडे दोन पैसे येतील शेवटी लोकांच्या पोटापाण्याचाही विचार करावा लागेल. अर्थचक्र सुरू ठेवण्याबरोबरच कोविड विरूध्दची लढाई देखील आपल्याला लढावी लागेल. या सर्वांचा विचार करून लॉकडाऊन शिथिल करत असल्याचे त्यांनी सांगितले. जनजीवन पुर्वपदावर आणतांना नागरिकांना मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे यासारखे नियम पाळावेच लागतील. फक्त रूग्णसंख्या वाढली म्हणजे लॉकडाऊन करणे हा पर्याय होउ शकत नाही. त्यामुळे आता यापुढे लॉकडाऊन होणार नाही असे पुन्हा एकदा भुजबळ यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

काय म्हणाले भुजबळ

* जिल्हा रूग्णालयात कोविड टेस्टिंग लॅब तयार करणार.
* अर्थव्यवस्था सुरळीत करणे आवश्यक.
* मास्क न घालणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश.
* शाळा ऑनलाईन सुरू करणे हे मुलांसाठी आवश्यक.
* अर्थचक्राबरोबर ज्ञानदानाचं चक्रही सुरू व्हायला हवे.
* करोनासाठी सरकारी रूग्णालयांमध्ये जागा राखीव ठेवणार.
* करोना बाधित मृत्युच्या संख्येत कोणतीही लपवाछपवी नाही.
* आरोप करणे हे विरोधी पक्षाचे कामच.
* भारत चीन हल्ल्याप्रकरणी राजकारण सोडून आम्ही सर्व एकत्र आहोत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -