घरमहाराष्ट्रनाशिकपोलीस आयुक्तांना भेटायला आता 'अपॉइंटमेंट'ची जरूर नाही

पोलीस आयुक्तांना भेटायला आता ‘अपॉइंटमेंट’ची जरूर नाही

Subscribe

सोमवार ते शुक्रवार एक तासाचा वेळ राखीव

नाशिक : नवनियुक्त पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी लोकाभिमुख कामकाज करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते, त्यासाठी कारणही तसंच आहे. त्यांनी कोणतीही आगाऊ वेळ न घेता सामान्य नागरिकांना आपल्या अडचणी तसेच सूचना पोलीस अतुक्तांकडे मांडता येतील यासाठी कार्यालयीन दिवसात रोज एक तासाची वेळ राखीव ठेवली आहे.
याबाबत पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रीजी यांनी माहिती देताना सांगितले. आयुक्त जयंत नाईकनवरे सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ ते ५ च्या दरम्यान नागरिकांना भेटणार आहेत. पोलीस आयुक्त आणि नागरिक यांच्यात समन्वय प्रस्थापित व्हावा अशी या मागची भावना दिसून येते.

आयुक्तांच हे पाऊल नक्कीच अभिनंदनीय असून यामुळे नागरिक आणि आयुक्त यांच्यातील दरी कमी होऊन, जमिनीवरच्या समस्या आयुक्तांना समजणार आहेत. तसेच नागरिकांनाही निर्भीडपणे आयुक्तकडे आपली समस्या मांडता येतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -