घरताज्या घडामोडीभाजपच्या नेत्यांना सोशल डिस्टनसिंगचा विसर

भाजपच्या नेत्यांना सोशल डिस्टनसिंगचा विसर

Subscribe

शासन-प्रशासन कोरोनाशी संघर्ष करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.त्याचाच एक भाग म्हणून नाशिक शहरासह राज्यातही संचारबंदी व जमावबंदी आदेश लागू करण्यात आले असून सद्यस्थितीत सोशल डिस्टनसिंगचा नियम देखील अविभाज्य झाला आहे. मात्र या सर्वांचा भाजप नेत्यांना विसर पडला असल्याचे चित्र दिसत आहे.
नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी शनिवारी मतदार संघातील रेशन दुकानातील धान्य वितरण व्यवस्थेची पहाणी केली. यावेळी त्याच्यासह सोबत असलेल्या सर्व पदाधिकारी, नगरसेविका व कार्यकर्त्यांनी मास्क लावण्याची काळजी घेतली असली तरी यावेळी त्यांना सोशल डिस्टनसिंगचा विसर पडल्याचे निदर्शनास आले. यावेळी झालेल्या फोटोसेशनमध्ये ५ पेक्षा जास्त व्यक्ती सोशल डिस्टनसिंगचे नियम न पाळता
एकत्र आल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे स्वतः आमदार सीमा हिरे यांनी ते फोटो आपल्या व्हाट्सअपच्या स्टेट्सला ठेवले आहेत.

 

- Advertisement -

दुसरीकडे प्रभाग २६ च्या भाजपा नगरसेविका अलका आहिरे व भाजपचे नेते कैलास आहिरे यांनी देखील रेशन दुकानात धान्य वितरण करतांनाचे फोटो सेशन केले असून त्यातही विना मास्क, सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळले नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. या प्रकारांनी भाजपच्या नेत्यांना सोशल डिस्टनसिंगचा विसर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -