घरताज्या घडामोडीपीक कर्ज वाटपास टाळाटाळ करणार्‍या चार बँकांना नोटीसा

पीक कर्ज वाटपास टाळाटाळ करणार्‍या चार बँकांना नोटीसा

Subscribe

जिल्हाधिकार्‍यांची कारवाई : बँक ऑफ महाराष्ट्र, एच.डी.एफ.सी, कोटक, युबीआय बँकेचा सामावेश

खरीप हंगाम सुरु होऊन दोन महिने लोटले असताना पीक कर्ज वाटपाचे पन्नास टक्के देखील उदिष्ट बँकांनी गाठले नसल्याचे समोर येत आहे. यंदा ३ हजार ३०० कोटी पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी आता पर्यंत १ हजार ३६२ कोटींचे वाटप झाले आहे. राष्ट्रियकृत बँका कर्ज वाटपात टाळाटाळ करत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे पीक कर्ज वाटपास टाळाटाळ करणारया बँकांना नोटीस बजावण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांना दिले आहेत.

कोरोना संकटामुळे शेतकरी अगोदरच अडचणीत आला आहे. खरिप हंगामात पेरणीसाठी बि बियाणे खरेदी, खते आदींसाठी शेतकर्‍यांना पैशाची गरज होती. ते बघता बँकांनी शेतकर्‍यांची अडवणूक न करता त्यांना कर्ज द्यावे असे आदेश शासनाने दिले होते. यंदाच्या खरिप हंगामात शेतकर्‍यांसाठी ३ हजार ३०३ कोटीचा कर्ज वाटपाचा आराखडा तयार करण्यात आला. जिल्हाधिकारी दर बुधवारी बैठक घेऊन कर्ज वाटपाचा आढावा घेतात. पीक कर्ज वाटपाची कासवगती लक्षात घेता वेग वाढावा असे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी बॅकांना दिले होते. तरी देखील काही बँका शेतकर्‍यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे. खरीपाचे दोन महिने लोटले तरी फक्त १३६२.५२ कोटींचे वाटप होऊ शकले. साधारणपणे ५२ हजार १३२ शेतकर्‍यांनी पीक कर्जाचा लाभ घेतला आहे. अद्याप हजारो शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहे. अद्याप ५० टक्के देखील कर्ज वाटप होऊ शकले नाही. विशेष म्हणजे राष्टी्रयकृत बँका कर्ज वाटप करण्यास टाळाटाळ करत आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणार्‍या बँकाना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या जाणार आहेत. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, एच.डी.एफ.सी, कोटक, युबीआय बँकेची कामगिरी असमाधानकारक असल्याचे दिसून आल्याने या बँकांना नोटीसा बजावण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अग्रणी बँक व्यवस्थापकांना दिले आहेत. तसेच महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांना नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडीया या बँकांनी कमी प्रमाणात कर्ज वाटप केलेले असल्याने याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांना कर्जवाटप करण्याबाबत सुचना दिल्या.

- Advertisement -

सेंट्रल बँक ऑफ इंडीयाने कर्ज वाटपाबाबत चांगले कामकाज केले असून बँकेला १०५ कोटी ९४ लाख रूपये उदिदष्ट देण्यात आले होते. त्यापैकी बँकेने ६२.०७ कोटी रूपयांचे कर्ज वाटप केले आहे.

बँक                      उदिदष्ट (रू.कोटीत)            कर्ज वाटप (रू.कोटीत)
राष्ट्रीयकृत बँक          २२४३.७९                        ९७४
ग्रामीण बँक              १६.८७                           ३.५८
खाजगी बँक             ६०५.७४                          १९६.४४
जिल्हा बँक              ४३७.८६                          १८७.७८

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -