Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र नाशिक 'यशवंत मंडई' बहुमजली पार्किंगसाठी आता भाजपाही आग्रही, आयुक्तांकडे केली 'ही' मागणी

‘यशवंत मंडई’ बहुमजली पार्किंगसाठी आता भाजपाही आग्रही, आयुक्तांकडे केली ‘ही’ मागणी

Subscribe

नाशिक : शहराच्या मध्यवर्ती भागातील मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी येणार्‍या ग्राहकांच्या वाहनांवर कारवाई करण्यात येऊ नये, व्यापार्‍यांच्या गाळ्यांसमोरील फुटपाथवर अतिक्रमण (Encroachment) केलेल्या फेरीवाल्यांना व्यवसासाठी अन्यत्र जागा उपलब्ध करून द्यावी, रविवार कारंजावरील यशवंत मंडई (Yashavant Mandai, Ravivar Karanja) येथील बहुमजली पार्किंगचा (multi-storied parking) विषय तातडीने मार्गी लावावा तसेच, व्यापार्‍यांच्या पार्किंगचा प्रश्न सोडवावा, अशी आग्रही मागणी भाजपच्या (Nashik BJP) वतीने महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्याकडे करण्यात आली. या मागण्यांचे निवेदनही शिष्टमंडळाने आयुक्तांना दिले.

या भेटीप्रसंगी भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव, व्यापारी आघाडी संयोजक शशिकांत शेट्टी, घाऊक किराणा व्यापारी संघटना अध्यक्ष प्रफुल संचेती, व्यापारी आघाडी सहसंयोजक राघवेंद्र जोशी, सहसंयोजक प्रतीक नांदुर्डीकर, गौतम हिरण, जितेंद्र चोरडिया, भाजप मंत्रिमंडळ व्यापारी आघाडीचे अध्यक्ष रवींद्र पारख उपस्थित होते. या सर्वांनी व्यापार्‍यांच्या समस्या मांडल्या. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने बाजापेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. बाजारपेठांमध्ये पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने नागरिकांना मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी करावी लागतात. मात्र, पोलिसांकडून या वाहनांवर कारवाई होत असल्याने ग्राहक येथे येण्याचे टाळतात. त्यामुळे येथील व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे रविवार कारंजावरील यशवंत मंडई जागेवरील बहुमली पार्किंगचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणीही यावेळी शिष्टमंडळातील सदस्यांनी केली.

- Advertisement -

महात्मा गांधी रोडवरील व्यापार्‍यांनी पोलीस कारवाईविरोधात काही दिवसांपूर्वी बंद पाळला होता. यावेळी पोलिसांनी व्यापार्‍यांबरोबर पार्किंगसाठी पर्यायी जागांची पाहणी केली होती. मात्र, हा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही. दोन वर्षे कोविडचे संकट व त्यानंतर स्मार्ट सिटीच्या कामांमुळे व्यवसाय ठप्प झाले. यामुळे व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे आता तरी सारासार विचार करून निर्णय घ्यावा. सर्व दुकानदार मालमत्ता कर भरतात तरीही त्यांचीच पिळवणूक केली जाते. त्यामुळे यावर तातडीने मार्ग काढावा.

या आहेत व्यापार्‍यांच्या सूचना व मागण्या

  • सणासुदीच्या काळात कारवाई करण्यात येऊ नये
  • बाजारपेठेनजीक पार्किंगची सोय करण्यात यावी
  • व्यावसायिकांच्या दुकानासमोरील फेरीवाल्यांना हॉकर्स झोन तयार करून द्यावे
  • फेरीवाल्यांची व्यवस्था केल्यास मोकळया जागेत वाहने पार्किंग व्यवस्था करावी
  • मुंबई व पुण्याच्या धर्तीवर यलो बेल्ट पार्किंग तत्वावर पार्किंग स्लॉट तयार करावेत
  • महात्मा गांधी रोडवरील व्यावसायिकांचा पार्किंग प्रश्न मार्गी लावावा
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -