घरमहाराष्ट्रनाशिकआता, नो पार्किंगमध्ये वाहने उभी केल्यास मोबाईलवरच येणार ई चलन; आजपासून वाहन...

आता, नो पार्किंगमध्ये वाहने उभी केल्यास मोबाईलवरच येणार ई चलन; आजपासून वाहन टोईंग बंद

Subscribe

नाशिक : नो पार्किंगमधून वाहने उचलतांना टोईंग कर्मचारयांबरोबर होणार्‍या कटकटीपासून नाशिककरांची सुटका होणार असली तरी, आता वाहनधारकांना नो पार्किंगमध्ये वाहन उभे केल्यास मोबाईलवर दंडाची पावती प्राप्त होणार आहे. टोईंगबाबतचा आदेश पोलीस आयुक्तांनी रदद केला आहे.

नाशिक शहरात वाहने उभी करण्यासाठी पुरेशी पार्किंग सुविधा उपलब्ध नसतानाही शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून टोईंग कारवाई केली जात होती. परंतु, या कारवाईबाबत नागरिक संताप व्यक्त करत होते. टोईंग कर्मचार्‍यांच्या उद्दामपणामुळे नागरिकांना दीड वर्षापासून मनस्ताप सहन करावा लागत असल्याकडेही पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. वाहने उचलण्यापूर्वी पूर्वसूचना देणे, संपर्क क्रमांक नोंदवण्यासह तीन मिनिटांची मुदत देणे अपेक्षित असताना, तसे होत नसल्याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले.

- Advertisement -

शहरात वाहने पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध करुन द्यावी किंवा टोईग कारवाई बंद करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. नो पार्किंगमधील वाहन टोईंग करुन शरणपूर रोडवरील वाहतूक शाखेच्या कार्यालयात नेले जात असत. संबंधित वाहनधारकाने या कार्यालयात जाऊन दंड भरला की त्याचे वाहन सोडण्यात येत असे. आता यापुढे टोईंग केले जाणार नसले तरी कारवाई मात्र सुरुच राहणार आहे. नो पार्किंगमधील वाहने टोईंग करण्यासाठी 7 मार्च रोजी श्रम साफल्य सर्व्हिसेस यांना पोलीस आयुक्तालयाने मुदतवाढ दिली होती. त्यानुसार एजन्सीने कारवाईदेखील सुरु केली. परंतु, यासंबंधीचा आदेश रद्द करण्यात येत असल्याची माहिती पोलीस आयुक्त शिंदे यांनी दिली. यापुढे शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत नो पार्किंगमधील वाहने टोईंग करण्यात येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अशी होणार कारवाई

टोईंग बंद करण्यात येत असली तरी मात्र थेट दंडात्मक कारवाई कारवाईला सुरवात होणार आहे. जी वाहने नो पार्किंगमध्ये दिसतील. त्यांचा फोटो काढला जाईल. त्या वाहनक्रमांकावरुन मालकाचा तपशील मिळवला जाईल. वाहनमालकाला थेट मोटर वाहन कायद्यान्वये ई-चलानद्वारे दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -