घरमहाराष्ट्रनाशिकजुन्या नाशकात मैंद वाडा कोसळला

जुन्या नाशकात मैंद वाडा कोसळला

Subscribe

वाड्याच्या भिंतीचा मलब्याचा मार लागल्याने कल्पेश मैंद किरकोळ जखमी, वाड्यांच्या पडझडीचे सत्र सुरूच

नाशिक नाशकातील सोमवार पेठेतील मैंद वाड्याच्या भिंतीचा मोठा भाग गुरुवारी (दि. ८) रात्री कोसळला. वाड्याच्या भिंतीचा मलब्याचा मार लागल्याने कल्पेश मैंद किरकोळ जखमी झाला. रहिवाशी प्रसंगावधान राखून वाड्याच्या बाहेर आल्याने पुढील अनर्थ टळला.

सोमवार पेठेत मैंद वाड्याचा काही भाग कोसळल्याची माहिती अग्निशमन दलास मिळताच जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी वाड्याची पाहणी करून काही धोकादायक झालेला भाग लोखंडी बारच्या सहाय्याने पाडला. रहिवाशांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. वाड्याची भिंत पडणार असल्याचे लक्षात येताच रहिवाशी बाहेर आले. सर्वजण बाहेर आले आल्यानंतर दहा मिनिटातच वाड्याची भिंत कोसळली. रहिवाशांनी प्रसंगावधान राखल्यामुळे जीवितहानी झाली. या घटनेत कल्पेश मैंद हा किरकोळ जखमी झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -