Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक आजीबाईंना सोन्याच्या बिस्कीटांचा मोह पडला महागात

आजीबाईंना सोन्याच्या बिस्कीटांचा मोह पडला महागात

बक्षीस म्हणून दिली भामट्यांना सोन्याची पोत

Related Story

- Advertisement -

‘आजी, तुमच्या पिशवीतून सोन्याचे बिस्कीट खाली पडले आहे’ असे भासवून दोन भामट्यांनी आजीचा विश्वास संपादन केला. नुकसान टाळल्याबद्दल बक्षिसी म्हणून सोन्याची मागणी केली. विशेष म्हणजे, आजीनेही गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची पोत आपल्या हाताने भामट्यांची ताब्यात दिल्याची घटना सीबीएस परिसरात शनिवारी (दि.२०) दुपारी अडीच वाजेदरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयवंताबाई लहामगे सीबीएस येथे एसटीतून उतरल्या. बसस्थानकातून बाहेर जात असताना दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या. आजी तुमची सोन्याची बिस्कीटे खाली पडली आहेत, असा आवाज दिला. त्यावर सोन्याची बिस्किटे माझे नसल्याचे आजीने सांगितले. बिस्किीटे तुमच्याच पिशवीतून पडली आहेत. आम्ही तुमचे नुकसान होण्यापासून वाचवत आहोत, असे म्हणत संशयितांनी आजींकडे नुकसान टाळल्याबद्दल बक्षिसीची मागणी केली. आजीने त्यांच्यावर विश्वास ठेवत त्या दोघांना बक्षीस म्हणून गळ्यातील ९५ हजार रुपये किंमतीची अडीच तोळ्याची सोन्याची पोत दिली. काही वेळेनंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जयवंताबाई यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठत भामट्यांविरुद्ध तक्रार दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करत आहेत.

- Advertisement -

 

- Advertisement -