Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र अवजड वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर; दोन दिवसांत तिसरा बळी

अवजड वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर; दोन दिवसांत तिसरा बळी

Subscribe

नाशिक : सातपूर -अंबड लिंकरोड अपघाताची मालिका सुरू आहे. अंबड लिंकरोडवरील संजीव नगरातील अपघातात पालिका कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच याच रस्त्यावर मंगळवारी (दि.२९) दोन अपघातामध्ये दोन जण ठार झाले. यानिमित्ताने शहरांतर्गत सुरु असलेल्या अवजड वाहतुकीचा आणि भरधाव वाहनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पूनम नितीन चव्हाण (वय ३०, रा. रामकृष्णनगर, अंबड), रवींद्र कुलकर्णी (वय 63, रा. राज्य कर्मचारी सोसायटी, अशोक नगर, सातपूर) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.

पहिल्या घटनेत, मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पूनम चव्हाण या दुचाकी (एमएच १५-डीएक्स ९६८७)वर मागे बसून जात असताना दत्तनगरकडून संजीवनगरच्या दिशेने लोखंडी सळ्या घेऊन जाणार्‍या ट्रकचा (एम एच १५ सीपी २७०८) धक्का दुचाकीला लागला. यात मागे बसलेल्या पूनम चव्हाण यांचा तोल जाऊन त्या खाली पडल्या असता ट्रकचे मागील चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. पूनम चव्हाण या नगर येथे राहत होत्या. आजारी वडिलांच्या सेवेसाठी त्या नाशिकला काही दिवसासाठी आल्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुले असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस चोकी पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून, चालक फरार आहे.

लिंक रोड बनला मृत्यू सापळा

- Advertisement -

सातपूर अंबड लिंक रोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या ठिकाणी खड्ड्यावर फक्त खडी टाकून वरवर दुरुस्ती केली जात आहे. योग्य डांबरीकरण करत रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे, निवृत्ती इंगोले यांच्यासह नागरिक करत आहेत.

वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार

दुसर्‍या घटनेत रवींद्र कुलकर्णी हे दुचाकी(एम एच 15 सीपी 2708) ने पपया नर्सरी येथून लिंक रोड मार्गे एक्सलो पॉईंट जात होते. ते संजीव नगर येथे मंगळवारी दुपारी सव्वादोन वाजता आले असता अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली होती. त्यात ते जबर जखमी झाल्याने त्यांना खासगी रुग्णालय दाखल करण्यात आले होते. सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, सुना असा परिवार आहे. परिसरातील सिीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे अज्ञात वाहनाचा तपास एमआयडीसी पोलीस चौकी चुंचाळेचे पोलीस करत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -