Monday, February 15, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक नाशिक सिव्हीलमधून दीड वर्षांचेे बाळ पळवले

नाशिक सिव्हीलमधून दीड वर्षांचेे बाळ पळवले

घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बंद, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Related Story

- Advertisement -

नाशिकमधील जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हील) तपासणीसाठी आलेल्या मातेची नजर चुकवून अज्ञात भामट्याने तिची दीड वर्षांची मुलगी पळवून नेल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.१३) घडली.

नाशिक शहरातील एक महिला आपल्या बहिणीसोबत दीड वर्ष वयाच्या मुलीला घेऊन सिव्हीलमध्ये नियमित तपासणीसाठी आली होती. यावेळी बाळाला बाहेरील बाकड्यावर बसवून महिला तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेली होती. महिलेची बहिणीचे लक्ष नसल्याची संधी साधत एका व्यक्तीने चपळाईने त्या मुलीला उचलून नेले. ही घटना लक्षात येताच महिलेने आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत ही व्यक्ती निघून गेलेली होती. ही घटना घडली त्यावेळी सुरक्षारक्षक जेवणासाठी बसले होते. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सरकारवाडा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, हाती आलेल्या फुटेजवरुन तपास सुरू केला आहे.

- Advertisement -