घरमहाराष्ट्रनाशिकमहिला पोलीस अधिकार्‍यास अश्लील संदेश

महिला पोलीस अधिकार्‍यास अश्लील संदेश

Subscribe

संशयिताला घेतले जळगावातून ताब्यात

पोलीस आयुक्तालयातील महिला वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यास एकजण मोबाईलवर अश्लील संदेश पाठवत होता. पोलिसांनी कसून तपास करत त्याला जळगावातून ताब्यात घेतले आहे. संशयित तरुण मूळचा जळगावातील गणपतीनगरमधील आहे.
संशयित तरुणाचे जळगावमध्ये हेअर अ‍ॅण्ड ब्युटी पार्लर दुकानामध्ये कामाला आहे. तो शहर पोलीस आयुक्तालयातील एका महिला वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना मोबाईलवर अश्लील संदेश पाठवत होता. पोलिसांनी मोबाईल क्रमांकावरून तपास सुरू केला असता मोबाईल वापरणारा जळगावातील असल्याचे निष्पन्न झाले. शहर पोलिसांनी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्याशी संपर्क केला. स्थानिक पोलिसांच्या मदतीने शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -