घरक्राइमपोलिसाच्या हल्ल्यात सासऱ्याचा मृत्यू; सासू, पत्नी गंभीर जखमी

पोलिसाच्या हल्ल्यात सासऱ्याचा मृत्यू; सासू, पत्नी गंभीर जखमी

Subscribe

भांडणातून पोलिसाने सिन्नर तालुक्यातील दोडी दापुर येथील सासरे, सासू व पत्नी यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचारादरम्यान सासऱ्याचा मृत्यू झाल्याने एकच खबळळ उडाली आहे.

समजलेली माहिती अशी, सूरज देविदास उगलमुगले (मनमाड पोलीस ठाण्यात दंगा नियंत्रण विभागात ) उपनगर यांनी दोडी दापूर येथील त्यांचे सासरे निवृत्ती दामोदर सांगळे (५८) शिला निवृत्ती सांगळे(५२), पत्नी पुजा सुरेश उगलमुगले यांच्यावर भांडणावरुन दोन दिवसांपुर्वी मारहाण करत तीक्ष्ण हत्याराने वार केले होते.  नाशिकरोड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना निवृत्ती सांगळे यांचा मृत्यू झाला असून, शिला सांगळे व पूजा उगलमुगले यांची तब्बेत गंभीर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -