घरमहाराष्ट्रनाशिकलेखानगर येथे दुचाकीवर झाड पडल्याने एकाचा मृत्यू

लेखानगर येथे दुचाकीवर झाड पडल्याने एकाचा मृत्यू

Subscribe

नाशिक : लेखानगर येथे दुचाकीवर गुलमोहरचे झाड पडल्याने दुचाकीवर मागे बसलेले अतुल गांगुर्डे (वय ३५) यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

लेखा नगर येथून बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दुचाकी जात असतांना गुलमोहोराचे झाड दुचाकीवर पडल्याने यात दुचाकीवर मागे बसलेले अतुल गांगुर्डे (वय ३५ ) रा. एकलहरा कॉलनी) यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. घटनास्थळी अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक शेख व सिडको अग्नीशामक दलाचे कर्मचारी दाखल झाले. अग्नीशामक दलाचे कर्मचारी यांनी रस्त्यावरील झाड काढून वाहतुक सुरळीत केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -