घरमहाराष्ट्रनाशिकदेवळा तालुक्यात कार व मोटरसायकल अपघातात खामखेडा येथील तरुण ठार

देवळा तालुक्यात कार व मोटरसायकल अपघातात खामखेडा येथील तरुण ठार

Subscribe

शेवाळे वस्तीनजीक असलेल्या वळणावर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक

देवळा तालुक्यातील खामखेडा परिसरात राज्य महामार्ग- १७ वर शुक्रवार, २५ जानेवारीला स्विफ्ट कार आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात खामखेडा येथील गोकुळ दादाजी मोरे (१७) हा तरुण ठार झाला.

कळवणकडून येणाऱ्या लखमापूर येथील शक्ती दळवी यांच्या स्विफ्ट डिझायर कार आणि खामखेडा येथून काळखडीकडे मोटरसायकलवरुन जात असलेले गोकुळ मोरे यांच्या दुचाकीत शेवाळेवस्तीवरील वळणावर समोरासमोर धडक झाली. त्यात गोकुळ  मोरे रस्त्याच्या कडेला फेकला जाऊन गंभीर जखमी झाला. उपचारासाठी मालेगाव येथे नेत असताना रात्री ११ वाजता त्याचा मृत्यू झाला. मोटरसायकलस्वार गोकुळ हा खामखेडा  येथील शेतकरी दादाजी सदाशिव मोरे यांचा एकुलता एक मुलगा, तर संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक मोरे यांचा पुतण्या होता. वडिलांना शेतीच्या कामात मदत व्हावी, यासाठी त्याने दहावीनंतर शिक्षण सोडले होते. दरम्यान, देवळा पोलिसांनी रात्री उशिरा घटनास्थळी पंचनामा केला. गोकुळच्या अपघाती निधनाने गावावर व मोरे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -