घरताज्या घडामोडीबिबट्याच्या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी

Subscribe

हस्तेदुमाला-हनुमंतपाडा (ता. दिंडोरी) येथे मंगळवारी (दि.७) सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात एकजण जखमी झाला. दामू दगडू गायकवाड (40) असे जखमीचे नाव आहे.

दामू गायकवाड हे मंगळवारी (दि. 7) सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घराबाहेर आले असता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात ते जखमी झाले. उपचारासाठी कुटुंबियांनी त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात प्राथमिक उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल आले आहे. याप्रकरणी वणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -