घरमहाराष्ट्रनाशिकपिकअप, मोटरसायकल अपघातात एक ठार

पिकअप, मोटरसायकल अपघातात एक ठार

Subscribe

मोटार सायकलचा वेग नियंत्रणात न आल्याने जोरदार धडक

भऊर रस्त्यावर शिव नाल्याच्या जवळ पिकअप व मोटारसायकल यांच्यात मंगळवार (दि. २९) भऊर येथील पोलीस पाटील भरत पवार यांनी देवळा पोलीस ठाण्यात खबर दिली असून, पुढील तपास करण्यात येत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिरवाडे वणी येथील युवक योगेश मुरलीधर निफाडे (वय २८) हा कळवणहून आपल्या हिरो होंडा स्प्लेंडरप्रो या मोटरसायकलने (एमएच१५-एफइ ९५३१) लोहोणेरकडे जात असताना दहा वाजेच्या दरम्यान भऊर नेपाळी चौफुली पास करून पुढे भरधाव वेगाने जात असताना समोरून येणार्‍या बांधकाम साहित्य व मजूर घेऊन जाणार्‍या पिकअपला (एमएच ४१-एयू ०४५१) मोटार सायकलचा वेग नियंत्रणात न आल्याने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकल स्वार योगेश निफाडे याच्या दोन्हीही पायाला, हाताला व डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाला. त्यास तातडीने कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले तेथे प्राथमिक उपचार केल्या नंतर पुढील उपचारासाठी नाशिक येथे नेले जात असताना वणीजवळील कृष्णगाव येथे वाटेतच त्यांचे निधन झाले. त्याच्या पश्चात आईवडील, दोन भाऊ असा परिवार आहे. कळवण येथील एका कृषी दुकानात तो काम करत होता.

- Advertisement -

या अपघाताबाबत भऊर येथील पोलीस पाटील भरत पवार यांनी देवळा पोलीस ठाण्यात अपघाताची खबर दिली असून पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे. याबाबत भऊर येेथील बापू पवार, दिलीप पवार, चंद्रकांत पवार, रामदास पवार, भाऊराव पवार दीपक पवार आदीनी अपघातग्रस्त युवकास रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -