घरक्राइमजुन्या भांडणातून एकास रिक्षाने फरफटत नेत लाकडी दांडक्याने मारहाण

जुन्या भांडणातून एकास रिक्षाने फरफटत नेत लाकडी दांडक्याने मारहाण

Subscribe

रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांसह पाचजणांना अटक

जुन्या भांडणाच्या वादातून संशयित सहाजणांनी एकास रिक्षाने फरफटत नेत शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी (दि.२८) सायंकाळी ६ वाजेदरम्यान मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल राजदूत ते हॉटेल छानजवळ घडली. याप्रकरणी किरण सुरेश सोनवणे यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेल राजदूतजवळील झोपटपट्टी, नाशिक येथील संशयित अरुण मारुती कांबळे (वय ३३), रणजित मारुती कांबळे (वय २७), विनायक गरुड (वय २१), महादेव सोळंके (वय २१), आकाश पवार (वय २१) अशी अटक केली. जगदीश गायकवाड (वय १९) याच्यासह सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, जुन्या भांडणाची कुरापत काढून संशयितांनी किरण सुरेश सोनवणे यास शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी दिली. त्यास जबरदस्तीने रिक्षामध्ये बसवून हॉटेल छानजवळ आणत लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच रिक्षाने त्यास फरफटत नेले. ही बाब पोलिसांना समजताच पोलिसांनी पाच संशयितांनी अटक केली. अरुण मारुती कांबळे व रणजित मारुती कांबळे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचा तडीपाराचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रविण शिंदे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -