घरताज्या घडामोडीअशी आहे थत्तेनगर पेशंटची हिस्ट्री

अशी आहे थत्तेनगर पेशंटची हिस्ट्री

Subscribe

नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील थत्तेनगर परिसरात स्वत:च्या घरी शनिवारी (दि.१७) मुंबईवरुन आलेला ८४ वर्षीय रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे निषन्न झाले आहे. खबरदारी म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नातलगांना क्वारंटाइन केले असून रुग्ण जिल्ह्याबाहेरील असल्याने व नागरिकांच्या संपर्कात न आल्याने महापालिकेने थत्तेनगर परिसर सील केलेला नाही. नाशिक शहरात एकूण ४८ रुग्ण कोरोनाबाधित आहेत.

गंगापूर रोडवरील थत्तेनगरमध्ये आलेला रुग्ण मूळचा कल्याणचा आहे. त्याचे थत्तेनगरमध्ये स्वत:चे घर आहे. रुग्ण पत्नी व मुलींसह शनिवारी (दि.१६) नाशकात आला होता. रुग्णामध्ये रविवारी करोनासदृश्य लक्षणे आढळून आल्याने त्यास कुटुंबियांनी उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयातर्फे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असता त्याचा रिपोर्ट बुधवारी पॉझिटिव्ह आला. थत्तेनगरमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने गंगापूर रोड परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. महापालिकेच्या आरोग्य विभागाने पॉझिटिव्ह रुग्णाबाबत शहानिशा केली. रुग्ण जिल्ह्याबाहेरील असून नाशिकमधील नागरिकांच्या संपर्कात आलेल्या नसल्याने महापालिकेने थत्तेनगर परिसर सील केला नाही. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या पत्नी व मुलीस क्वारंटाइन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -