घरमहाराष्ट्रनाशिकनाफेडतर्फे होणार कांदा खरेदी सुरू; यंदा, ३ लाख मे.टन खरेदीचे उद्दीष्ट

नाफेडतर्फे होणार कांदा खरेदी सुरू; यंदा, ३ लाख मे.टन खरेदीचे उद्दीष्ट

Subscribe

नाशिक : गतवर्षी १६ एप्रिल रोजी नाफेडने उन्हाळ कांदा खरेदीसाठी तयारी सुरू केली होती. ह्या वर्षी पण नाफेड कांदा खरेदी करणार असून ३ लाख मेट्रिक टन खरेदीचे उद्दिष्ट्य आहे. नाफेडमार्फत उन्हाळ कांदा खरेदीला सुरुवात केली जाणार असून लवकरच कांद्याची खरेदी सुरु होईल. यंदा मे महिना अर्ध्याहून अधिक झाला आहे. यामुळे बाजार समितीमधील स्पर्धा जरी संपली असली तरी कांदा खरेदी मात्र अद्याप सुरू आहे आणि शेतकर्‍यांना चांगला भाव मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्यामुळे लवकरच योग्य भाव मिळेल आणि तसेच नाफेडमार्फत कांद्याची खरेदी सुरु केली जाणार असल्याचे संकेत केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत डॉ. पवार यांनी भेट देत पाहणी केली. याप्रसंगी माध्यमांसोबत बोलताना यंदा ३ लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी लाल कांद्याला भाव नसल्याने उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी केंद्रिय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेत लाल कांद्याची नाफेडमार्फत प्रथमच खरेदी करण्यात आली. आता उन्हाळ कांद्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे दोन वर्षापर्यंत ४० हजार मेट्रिक टनापर्यंत कांद्याची खरेदी केली जात होती,

- Advertisement -

गेल्या वर्षी अडीच लाख मेट्रिक टन खरेदी केली होती, यंदा तीन लाख मेट्रिक टनापर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाफेड बरोबर नाफेडच्या सब एजन्सी शेतकरी प्रोडूसर कंपनी बाजार समितीतून कांद्याची खरेदी करतील, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. यावेळी माजी सभापती सुवर्णा जगताप, सचिव नरेंद्र वाढवणे, सहा सचिव प्रकाश कुमावत, सुनील डाचके, मनोज जैन, प्रकाश पाटील, संजय शेवाळे आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -