घरताज्या घडामोडी16 जुलैपासून 11वीचे ऑनलाईन प्रवेश

16 जुलैपासून 11वीचे ऑनलाईन प्रवेश

Subscribe

संभाव्य वेळापत्रक जाहीर: आजपासून शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी सुरु

नाशिक : महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. 16 जुलैपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज भरता येणार असल्याने आता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. येत्या 15 जुलैपर्यंत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.
लॉकडाऊनमुळे दहावी परीक्षेचा निकालास अगोदरच उशिर झाला आहे. अशा परिस्थितीत अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेस उशिर होऊ नये म्हणून शिक्षण उपसंचालक पुष्पावती पाटील यांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. येत्या 15 जुलैपर्यंत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. त्यानंतर 16 जुलैपासून विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश अर्जाचा भाग-१ भरु शकणार आहेत. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन अर्जाचा भाग-२ सादर करता येणार आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी प्रमाणाचे पसंती क्रमाणे दहा महाविद्यालय निवडता करता येईल. तसेच कला, वाणिज्य व विज्ञान यापैकी एक शाखा निवडता येणार आहे. इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत ही प्रक्रिया सुरु राहिल. ज्या शाळेत विद्यार्थी सध्या दहावीला आहेत, त्या शाळेतूनही हा अर्ज भरता येईल. तसेच सायबर कॅफेतूनही ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. शाळांना नोंदणी करण्याची प्रक्रिया पूर्णत: ऑनलाईन असल्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयात एकाही मुख्याध्यापकास किंवा प्राचार्यांना जावे लागणार नाही.

असे होतील प्रवेश
प्रवेश प्रक्रियेत यंदा आर्थिक व सामाजिक दृष्ठ्या मागास अर्थात इएसबीसी कोट्यातून 12 टक्के विद्यार्थ्यांना तर, दिव्यांगांसाठी 4 टक्के जागा राखिव ठेवण्यात येणार आहेत. याव्यतिरीक्त इनहाऊस कोट्यातून 10 टक्के व व्यवस्थापन कोट्यातून 5 टक्के जागा भरण्यात येतील. अल्पसंख्यांक शाळांना 50 टक्के जागा राखिव ठेवण्याचे आदेश आहेत.

प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक
-1 ते 15 जुलै: उच्च माध्यमाध्यमिक शाळा, महाविद्यालयांची नोंदणी
-2 ते 16 जुलै: शिक्षण उपसंचालक कार्यालयाने महाविद्यालयांची माहिती तपासणे
-16 जुलै ते दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत:विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जाचा भाग-१

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -