घरमहाराष्ट्रनाशिकबारावीचा निकाल पाहण्यापूर्वी हे नक्की वाचा

बारावीचा निकाल पाहण्यापूर्वी हे नक्की वाचा

Subscribe

बारावीचा आज ऑनलाईन निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी (एचएससी) परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी (ता.२८) दुपारी एकला जाहीर होणार आहे. बोर्डाच्या संकेतस्थळासह एसएमएस सेवेद्वारे फोनवरदेखील निकाल पाहता येणार आहे. नाशिक जिल्ह्यातून ७४ हजार ५६४ तर विभागातून १ लाख ६८ हजार ३५८ विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे.

शिक्षण मंडळातर्फे २१ फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. सीबीएसईचा दहावी आणि बारावीचा निकाल पंधरा दिवसांपूर्वीच जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नाशिक विभागीय मंडळातील नाशिक जिल्ह्यातून ७४ हजार ५६४, धुळ्यातून २५ हजार २८२, नंदूरबारमधून १६ हजार ९४०, जळगावमधून ५१ हजार ५७२, असे विभागातून एकूण १ लाख ६८ हजार ३५८ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे.

- Advertisement -

येथे पाहा निकाल

www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
www.maharashtra12.jagranjosh.com
www.mahahsscboard.maharashtra.gov.in

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -