घरमहाराष्ट्रनाशिकशेतमाल तारण योजनेचे जिल्ह्यात केवळ ८ लाभार्थी

शेतमाल तारण योजनेचे जिल्ह्यात केवळ ८ लाभार्थी

Subscribe

नाशिक विभागात घेतला १०० शेतकर्‍यांनी फायदा

हंगामात एकाचवेळी शेतमाल विक्रीसाठी आल्यानंतर त्याच्या किंमती पडतात. यामुळे होणारे शेतकर्‍यांचे पणन मंडळाच्या माध्यमातून शेतमाल तारण योजना राबवली जात आहे. मात्र, नाशिक विभागात या योजनेत मागील वर्षी केवळ १०० शेतकर्‍यांनी भाग घेतला असून त्यात नाशिक जिल्ह्यातील केवळ ८ शेतकरी आहेत. राज्यात विशेषता विदर्भात या योजनेला चांगला प्रतिसाद असल्याचे दिसून येते.

एकाच वेळी बाजारात शेतमाल आल्यानंतर त्याच्या किंमती कोसळतात, यामुळे शेतकर्‍यांना अपेक्षित दर मिळत नाही. यामुळे शेतमाल बाजार समित्यांच्या गुदामात ठेवण्याची शेतमाल तारण योजना सुरू करण्यात आली आहे. शेतकर्‍यांनी शेतमाल १८० दिवसांसाठी गुदामामध्ये ठेवल्यास त्यांना चालू बाजारभावाप्रमाणे ७५ टक्के रक्कम दिली जाते व त्या रकमेवर ६ टक्के दराने व्याज आकारणी केली जाते. सहा महिन्यांच्या आत शेतमालाचे दर वाढल्यास शेतकरी तो माल विकून बाजार समितीकडून घेेतलेल्या कर्जाची परतफेड करू शकतात.

- Advertisement -

या योजनेमुळे शेतकर्‍यांना कमी दराने शेतमाल विक्री करण्याची वेळ येत नाही व त्याला तातडीच्या गरजेसाठी रक्कमही उपलब्ध होते. पणन मंडळ व बाजार समित्यांच्या सहयोगातून ही योजना राबवली जात आहे. मागील आर्थिक वर्षात या योजनेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी नाशिक विभागात गेल्या वर्षभरात केवळ १०० शेतकर्‍यांनी त्याचा लाभ घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव व पिंपळगाव बसवंत या दोनच बाजार समित्यांनी ही सुविधा उपलब्ध केली असून त्याचाही प्रत्येकी चार म्हणजे आठ शेतकर्‍यांनी लाभ घेतला आहे.

राज्यात प्रतिसाद

शेतमाल तारण योजनेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. वा योजनेत सध्या १० हजार ६२४ शेतकर्‍यांनी त्यांचा शेतमाल तारण ठेवला असून त्यांना बाजार समित्यांनी त्यापोटी ९३.३७ कोटी रुपये कर्जाऊ दिली आहे.

- Advertisement -

तारण ठेवता येणारा शेतमाल

शेतमाल तारण योजनेंतर्गत तूर, सोयाबीन, मूग, उडीद, हरभरा, भात, ज्वारी, बाजारी, मका, गहू, करडई, सूर्यफूल व हळद बाजार समित्यांच्या गुदामात ठेवता येते.

अशी होते व्याज आकारणी

शेतकर्‍यांनी बाजार समित्यांच्या गुदामात शेतमाल तारण ठेवल्यानंतर चालू बाजारभावाच्या ७५ टक्के रक्कम शेतकर्‍यांना दिली जाते. त्यावर सहा महिने म्हणजे १८० दिवस सहा टक्के दराने व्याज आकारणी केली जाते. १८० दिवसांपेक्षा अधिक काळ शेतमाल ठेवल्यास सहा महिन्यांपर्यंत सहा टक्के व पुढील सहा महिने ठेवल्यास १२ टक्के दराने व्याज आकारतात. या गुदामात जास्तीत जास्त दीड वर्षे शेतमाल ठेवता येतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -