घरमहाराष्ट्रनाशिकशहरात केवळ ९७ नवे रुग्ण; मृत्यू मात्र २७०

शहरात केवळ ९७ नवे रुग्ण; मृत्यू मात्र २७०

Subscribe

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या ओसरत असल्याने गुरुवारी (दि.१०) दिवसभरात ३०७ नवे रुग्ण आढळून आले. यामध्ये नाशिक शहर ९७, नाशिक ग्रामीण २००, मालेगाव ३ आणि जिल्ह्याबाहेरील ७ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात १० रुग्णांचा नाशिक शहर ३, नाशिक ग्रामीण ६ आणि जिल्ह्याबाहेरील एकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, २७० मृत रुग्णांची आकडेवारी शासनाच्या पोर्टलवर अपडेट करण्यात आली आहे. त्यात नाशिक शहर १६७, मालेगाव २, नाशिक ग्रामीण ९१ आणि जिल्ह्याबाहेरील १० रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात १२० रुग्ण कोरोनामुक्त झाले.

जिल्ह्यात १७ लाख ५४ हजार ८९२ संशयित रुग्णांनी कोरोना टेस्ट केली. त्यात ३ लाख ९० हजार १९४ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी ३ लाख ८० हजार १२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हीटी रेट सरासरी ४.७५ आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता अवघे ४ हजार ८०९ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहे. यामध्ये नाशिक शहर १ हजार ९१५, नाशिक ग्रामीण २ हजार ७४०, मालेगाव १४६ आणि जिल्ह्याबाहेरील ८ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण ५ हजार ३७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक नाशिक ग्रामीणमधील २ हजार ५६२ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे ९७ टक्के आहे. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांसह आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

आकडेवारीतील गोंधळ कसा आला पुढे?

नियमानुसार आयसीएमआर पोर्टलवर नोंद झालेल्या मृत्यूचे आकडेच पालिकेला जाहीर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे या रुग्णालयांकडून दररोज आकडे अपडेट केले जात आहेत. एकीकडे रुग्णसंख्या कमी होत असताना दुसरीकडे मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. प्रत्यक्षात यापूर्वी मृत्यूमुखी पडलेल्यांची माहिती अनेक रुग्णालयांकडून आता सादर होत आहे. त्यामुळे मृत्यूच्या आकड्यांमध्ये कमालीची वाढ होत असल्याचे स्पष्ट होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -