घरताज्या घडामोडीनाशिक एसटी अपघात : 'मृत कुटुंबियांमधील एका व्यक्तीला एसटीमध्ये नोकरी द्यावी'

नाशिक एसटी अपघात : ‘मृत कुटुंबियांमधील एका व्यक्तीला एसटीमध्ये नोकरी द्यावी’

Subscribe

नाशिक एसटी अपघातात मृत झालेल्या कुटुंबियांमधील एका व्यक्तीला एसटीमध्ये नोकरी द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

मालेगाव-देवळा रस्त्यावरील मेशी फाटा येथे धोबीघाटजवळील देश-विदेश हॉटेलजवळ मंगळवारी दुपारी एसटी बस आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, कठडा तोडून रिक्षा आणि बस विहिरीत कोसळली. या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला असून ३० प्रवासी जखमी झाले आहे. या घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते. मृतांची संख्या वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यूमुखी पावलेल्या कुटुंबियांपैकी एका व्यक्तीला राज्य परिवहन महामार्ग (एसटी) च्या सेवेमध्ये नोकरी देण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज केली आहे.

…अन्यथा मुलीच्या शिक्षणाचा खर्च आम्ही उचलू

या दुर्घटनेत मृत्यूमुखी पावलेल्या रिक्षामधील मुस्लिम कुटुंबियांसह मृत रिक्षाचालकाच्या कुटुंबियांच्या घरी जाऊन दरेकर यांनी भेट घेतली. दरम्यान, या दु्र्घटनेतील मृत रिक्षाचालकाचे कुटंब वाऱ्यावर आले आहे. आई-वडिलांचे निधन झाल्यामुळे मुलीच्या शिक्षणाची व्यवस्था आता शासनाने करावी, अन्यथा आम्ही त्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलू, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

या अपघातामध्ये एसटी मधील मृत प्रवाशांच्या कुटुबीयांना शासनाने दहा लाखाची मदत जाहीर केली. परंतु, याच अपघातात खासगी रिक्षामधील जे प्रवासी मृत पावले त्यांना शासकीय मदत देण्याचे धोरण नाही आहे, तरीही या अपघाताचे गांर्भीय ओळखून रिक्षामधील मृत प्रवाशांच्या कुटुंबियांनाही आर्थिक मदत दयावी, अशी मागणी दरेकर यांनी यावेळी केली.

नक्की काय घडलं?

मेशी फाट्याजवळ मालेगावहून कळवणकडे जाणाऱ्या बसचे टायर फुटले. त्यामुळे बसचालकाचे नियंत्रण सुटून पुढे असलेल्या रिक्षावरती बस आदळली. अपघातनंतर दोन्ही वाहने फरफटत जाऊन विहिरीत कोसळली. आधी रिक्षा त्यानंतर बस कोसळली. रात्री उशिरापर्यंत अपघातस्थळी मृतांचा शोध आणि मदतकार्य सुरू होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह आमदार डॉ. राहुल आहेर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले.

- Advertisement -

हेही वाचा – नाशिक भीषण अपघात; मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -