घरताज्या घडामोडी... अन्यथा नाशिकमध्ये पुन्हा कडक निर्बंध

… अन्यथा नाशिकमध्ये पुन्हा कडक निर्बंध

Subscribe

कोरोना प्रार्दुभावाच्या पार्श्वभुमीवर पालकमंत्र्यांचे संकेत

नाशिकमध्ये कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. १९ नोव्हेंबरनंतरचा जर आढावा घेतला तर १९ नोव्हेंबरनंतर आजपर्यंत कोरोना रूग्णसंख्या १२०० ने वाढली आहे. आज जिल्हयात ३२०० कोरोना रूग्ण उपचार घेत आहेत. ही बाब चिंताजनक असून प्रशासनाकडून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरीकांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने जर अशाच पध्दतीने प्रार्दुभाव वाढत राहीला तर नाईलाजाने पुन्हा एकदा कडक निर्बंध लावले जातील असे संकेत जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

कोरोनाच्या दुसरया लाटेच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आज भुजबळ यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले, सप्टेंबर महीन्यात जिल्हयात सर्वाधिक म्हणजे १० हजार ८०० कोरोना बाधित रूग्ण होते. मात्र हळूहळू रूग्ण संख्या घटत गेली. नोव्हेंबरमध्ये २५०० च्या आसपास कोरोना रूग्ण आढळून आले. मात्र दिवाळीनंतर पुन्हा रूग्णसंख्येत वाढत होतांना दिसत आहे. आजमितीस ३२०० रूग्ण जिल्हयात उपचार घेत आहेत. व्हेंटीलेटरवर असलेल्या रूग्णांची संख्या वाढत आहे. त्याचप्रमाणे ऑक्सिजनबेडवरील रूग्णही वाढत आहेत. रूग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाकडून सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

ग्रामीण भागात आणि शहरातील काही भागात नागरीक जणू काही कोरोना संपला अशा अर्विभावात विनामास्क फिरतांना दिसतात. यामुळे स्वतःला आणि समाजिक सुरक्षाही धोक्यात आणत आहेत. त्यामुळे यापुढे ‘नो मास्क, नो एन्ट्री’ ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल. मास्क न लावता येणार्‍या ग्राहकांना जर दुकानदारांनी वस्तू दिल्या तर दुकानदारावर कारवाई तर होईलच परंतु दुकानही काही काळासाठी बंद केले जाईल असे आदेश देण्यात आले आहेत. या सर्व उपाययोजना करत असतांना जर नागरीक बेफिकीर असतील तर मात्र पुन्हा एकदा कडक निर्बंंध लागू केले जातील असा इशाराच त्यांनी यावेळी दिला.

टेस्टिंगची मर्यादा वाढवणार

सध्या जिल्हा रूग्णालय, मविप्र रूग्णालय, दातार, आणि पुणे येथून सध्या कोविड टेस्ट रिपोर्ट आपल्याला प्राप्त होतात. सध्या आपण साडेपाच हजार चाचण्या दररोज करू शकतो. परंतु ही क्षमता वाढविण्यासाठी जिल्हा रूग्णालय, महापालिकेचे बिटको रूग्णालयात अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असून यामुळे दररोज साडेसात हजार टेस्ट केल्या जातील असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

या उपाययोजना करणार

कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांसाठी पोस्ट कोविड सेंटर सुरू करणार.
‘नो मास्क नो एन्ट्री’ मोहीम अधिक कडक करणार.
कोरोना झाल्यानंतर आणि बरे झाल्यानंतर घ्यावयाची काळजी याबाबत जनजागृती.
टेस्टिंग लॅबची क्षमता वाढवणार.
जिल्हयात सध्या १८ हजार ६५० बेडसची व्यवस्था उपलब्ध.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -