Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र ..अन्यथा नाशिककरांचा उद्रेक; वाढत्या गुन्हेगारीवरुन पोलीस आयुक्तांना भुजबळांचा इशारा

..अन्यथा नाशिककरांचा उद्रेक; वाढत्या गुन्हेगारीवरुन पोलीस आयुक्तांना भुजबळांचा इशारा

Subscribe

नाशिक : नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीची घटनांना ऊत आला आहे. दर दिवसाआड खूनाच्या घटनांमुळे शहरातील वातावरण बिघडत आहे. सर्वसामान्य नागरिकांना जगणे अवघड झाले आहे, असा संदर्भ देत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पोलीस आयुक्तांना कठोर शब्दांत इशारा दिला. वाढती गुन्हेगारी थांबवा अन्यथा नाशिककर रस्त्यावर उतरतील, असेही त्यांनी सांगितले.

काही दिवसांपासून शहरातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मारहाण, खून, प्राणघातक हल्ले अशा घटना सातत्याने समोर येत आहेत. पोलिसांकडून एक गुन्ह्याची उकल होत नाही, तोच दुसरा गुन्हा घडत आहे. यामुळे नाशिकचे वातावरण बिघडत चालले आहे. आता यात अल्पवयीन मुलेदेखील गुन्हेगारीकडे वळत असल्याचे चित्र आहेत. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी कठोर भूमिका घेतली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला.

- Advertisement -

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. दर दिवसाआड खून, अत्याचार, मारहाणीच्या घटना घडत आहेत. पोलीस प्रशासन काय करते आहे? जे कोणी पोलीस आयुक्त आहेत, त्यांना गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवावे लागेल अन्यथा नाशिकच्या जनतेचा उद्रेक तुम्हाला पाहायला मिळेल, अशा इशाराही त्यांनी दिला. नाशिक शहरात मागील आठवडाभराचा विचार केल्यास शहरात दोन खून, अनेकांवर प्राणघातक हल्ले, गोळीबार, कोयता गँगची दहशत अशा घटना समोर आल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी फुलेनगर परिसरात भरवस्तीत घरात घुसून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर सातपूर परिसरात दिवसाढवळ्या पूर्ववैमनस्यातून गोळीबार करण्यात आला. यातील संशयित अद्यापही फरार आहेत. तर, दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी पाथर्डी फाटा परिसरात कंपनी व्यवस्थापकाच्या खून करण्यात आला. यातील संशयित अद्यापही फरार आहेत. शनिवारी दुपारच्या सुमारास दहावीच्या पेपर सुटल्यानंतर काही संशयितांनी एका अल्पवयीन दहावीच्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला करत पळ काढला. या सर्व घटना या भरवस्तीत होत असल्याने पोलिसांचा कुणाला धाकच राहिला नसल्याचे चित्र आहे, से सांगत भुजबळांनीदेखील पोलीस आयुक्तांवर निशाणा साधला.

पोलिसांची कुमक वाढवावी
- Advertisement -

नाशिकच्या जनतेच्या वतीने आम्ही उठाव करू, असा इशारा ़भुजबळांनी दिला. पोलिसांकडे कुमक कमी असेल तर त्याबाबत पाठपुरावा आम्हीदेखील केला. विधानमंडळात याबाबत विचारणा केली की, पोलीस बळ कमी पडत असून गुन्हेगारी वाढली आहे. तसेच, लवकरात लवकर पोलिसांची कुमक वाढवावी, अशी मागणी केल्याचेही भुजबळ म्हणाले.

- Advertisment -