Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र नाशिक आरक्षणासाठी ओबीसी समाजाचा रास्ता रोको

आरक्षणासाठी ओबीसी समाजाचा रास्ता रोको

समता परिषदेच्यावतीने व्दारका चौकात आंदोलन

Related Story

- Advertisement -

स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. हे आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध न्याय मुद्यांवर केंद्र सरकारच्या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सर्व ओबीसी संघटनांनी आज द्वारका चौकात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. नाशिकमध्ये समता परिषदेने रास्ता रोको करत आंदोलन केले. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्त्वात या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. ओबीसी आरक्षण वाचवा यासाठी आक्रोश आंदोलन करण्यात आलं. सध्या या आंदोलनासाठी स्वत: छगन भुजबळ हे रस्त्यावर उतरले नसले, तरी त्यांच्याच नेतृत्त्वात हे आंदोलन होत आहे. यावेळी केंद्राविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. समता परिषदेचे कार्यकर्ते हातात निषेधाचे फलक घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. तर काहीजण महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची वेशभुषा परिधान करून या आंदोलनात सहभागी झाले होते. द्वारका परिसरात आंदोलनाला सुरुवात होताच नाशिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतले. ओबीसी समाजाचे नेते राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ हे ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयीन लढाई लढत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक पातळीवर सर्व ओबीसी संघटना रस्त्यावर उतरून ओबीसी समाजाच्या भावना शासनापर्यंत पोहचवत असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष दिलीप खैरे यांनी दिली.

- Advertisement -