घरमहाराष्ट्रनाशिकविवाहितेच्या मृत्यूने नातेवाईकांचा आक्रोश, जिल्हा रुग्णालय आवार सुन्न

विवाहितेच्या मृत्यूने नातेवाईकांचा आक्रोश, जिल्हा रुग्णालय आवार सुन्न

Subscribe

विवाहितेचा सासरच्या छळाला कंटाळून मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात येत आक्रोश केला. लग्नाला अवघी तीन वर्षे झाल्याने आणि दीड वर्षांची मुलीचे मातृछत्र हरलपल्याने माहेरकडच्या महिलांनी हांबरडा फोडला. हे दृश्य पाहून रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक आणि पोलीस भावूक झाल्याचे दिसून आले.

नाशिक : विवाहितेचा सासरच्या छळाला कंटाळून मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात येत आक्रोश केला. लग्नाला अवघी तीन वर्षे झाल्याने आणि दीड वर्षांची मुलीचे मातृछत्र हरलपल्याने माहेरकडच्या महिलांनी हांबरडा फोडला. हे दृश्य पाहून रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक आणि पोलीस भावूक झाल्याचे दिसून आले.

सोनाली अभिषेक देवकर (वय २२, रा. नांदूरनाका, आडगाव शिवार) हिचा मंगळवारी (दि.७) संशयास्पद मृत्यू झाला. माहेरहून एक लाख रुपये आणावेत, यासाठी तिला सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्यातून ती ताणतणावत होती. तिचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली. शवविच्छेदनात तिने गळफास घेतल्याचे समोर आले. तिच्या मृत्यूला पती आणि सासूच कारणीभूत आहे, असा आरोप तिच्या नातेवाईकांनी करत आक्रोश केला. महिलांनी हांबरडा फोडत सासरच्यांनी मुलीचा बळी घेतला असा आरोप केला. गरीब कुटुंबातील मुलीचा मृत्यू झाल्याने आणि तिची आई सुरतला असल्याने नातेवाईक भावूक झाले होते. महिलांचा आक्रोश पाहून जिल्हा रुग्णालयाच्या आवारात ये-जा करणारे डॉक्टर, परिचारिक, रुग्ण व त्यांचे नातेवाईक आणि पोलीस हवालदिल झाले. जिल्हा रुग्णालयात संवेदनशील वातावरण निर्माण झाल्याने सरकारवाड पोलीस ठाण्याचे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी महिलांचा आक्रोश पाहून त्यांची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली.

नांदावयाचे नव्हते तर माहेर सोडायचे, मारुन नव्हते टाकायचे

सोनालीला सासरच्या मंडळींनी गळफास दिला. तिला सासरीची मंडळी नांदवत नव्हते. तिला नांदावयचे नव्हते तर ज्यांची मुलगी आहे, त्यांच्यापशी तिला सोडून द्यायचे होते. तिला मारुन टाकायचे नव्हते. तिच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा दिसून आल्या आहेत.  – शिलाबाई जाधव, मृत सोनालीचे नातेवाईक

Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -