‘आयुष्यभर खोटं वागू शकला म्हणून पद्मश्री पुरस्कार’

साहित्य संमेलन स्वागताध्यक्ष छगन भुजबळांचा काव्यचिमटा

नाशिक : अहो खोट्याची दुनिया आमची,सर्व खोटे, सर्व निरर्थक, खोटे वागता येत नाही म्हणून शिवीगाळ..! आयुष्यभर उत्तम खोटं वागू शकला म्हणून गौरव पुरस्कार..!

कवयित्री प्राजक्ता माळी यांच्या कवितेला साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी जोड देत, ‘आयुष्यभर उत्तम खोटं वागू शकला म्हणून पद्मश्री पुरस्कार’ असा टोला कंगना रनौतचे नाव न घेता लगावला.

निमित्त होते, अभिनेत्री तथा कवयित्री प्राजक्ता माळी यांच्या प्राजक्त प्रभा या काव्यसंग्रहाच्या तिसर्‍या आवृत्ती प्रकाशन कार्यक्रमाचे. साहित्य संमेलन व खान्देश मराठा मंडळ, नाशिकतर्फे गुरुवारी (दि.१८) सायंकाळी 6.30 वाजता कालिदास कलामंदिर संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, प्राचार्य मिलिंद जोशी, प्राचार्य प्रशांत पाटील यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कवयित्री माळी यांनी काव्यसंग्रहातील काही कवितांचे वाचन केले. स्वागताध्यक्ष भुजबळ म्हणाले, संमेलनात कोणतीही कमतरता राहणार नाही, त्यादृष्टीने साहित्य संमेलन अतिशय उत्कृष्ट होईल. काव्य कट्ट्यासाठी सुमारे 950 अधिक कवी सहभागी होणार असून, काव्य वाचनाचा विक्रम होईल.