घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रयुक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची तक्रार

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची तक्रार

Subscribe

विद्यार्थ्यांना अन्नपाणीही मिळेना

जळगाव : युक्रेन-रशिया युद्ध अद्यापही सुरूच आहे. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले बारा विद्यार्थी अद्यापही तेथे अडकले आहेत. त्यांना अन्न, पाणी मिळत नाही. युक्रेनमधील भारतीय दूतावासातील दूत त्यांच्या संपर्कात नसल्याच्या तक्रारी या पालकांनी जिल्हा प्रशासनाकडे केल्या. या विद्यार्थ्यांची माहिती व पालकांच्या दुतावासासंबंधी असलेल्या तक्रारी मंत्रालयाकडे जिल्हा प्रशासनाने सोमवारी पाठविल्या आहेत.

अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये श्रद्धा धोनी (लोहारा, ता. पाचोरा), बरिना पटेल, शेख फतेमा अन्सर अहमद, लोकेश निंभोरे, चाळीसगाव येथील प्रसन्न निकम, सौरभ पाटील (रा. महाबळ कॉलनी, जळगाव), ओम कोल्हे, रोहन चव्हाण, मुस्कान जयस्वाल, कल्याणी पाटील, क्षितिजा सोनेवणे याचा समावेश आहे. ते युक्रेनमध्ये ‘एमबीबीएस’चे शिक्षण घेत आहे. तर यश परदेशी एम.डी. झाले आहेत. युद्धामुळे त्यांचे अन्न, पाण्यासाठी हाल होत आहेत. युक्रेनमधील भारतीय दूतावासातील दूत या विद्यार्थ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. याकडे लक्ष देऊन त्यांना अन्न, पाणी देण्याची व्यवस्था करावी, त्यांना भारतात सुखरूप परत आणण्याची मागणी पालकांनी केली आहे.

- Advertisement -

१९ पैकी 5 विद्यार्थी मायदेशी परतले

युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेेलेले १९ विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थी मायदेशीपरतले आहेत. सहा विद्यार्थी बॉर्डरवर असून, ६ विद्यार्थी प्रवासात आहेत. तर दोन विद्यार्थ्यांचा संपर्क होत नसल्याची माहीती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. निकिता आमले, शोएब रशिद काकर, सुरज शिंदे, देवांग किशोर वाणी, पटेल बरिरा युसुफ हे पाच विद्यार्थी मायदेशी परतले आहेत. सौरव विजय पाटील, ओम मनोज काळे, मुस्कान रामशंकर जैस्वाल, श्रध्दा आनंद धोनी, लोकेश विजय निंभोरे, क्षितीजा गजानन सोनवणे हे सहा विद्यार्थी युक्रेनमधून हंगेरी, रुमालीया, पोलंड अशा वेगवेगळ्या बॉर्डरवर पोहचले आहेत. तर विराज दिलीप परदेशी, प्रसन्ना संजय निकम, कल्याणी छनगराव पाटील, निलेश योगराज पाटील, सुमित सुरेशचंद्र वैश्य, रोहन सुनील चव्हाण हे सहा विद्यार्थी प्रवासात आहेत.तसेच यश राजेंद्र परदेशी, शेख शिमा फातेमा अन्सर अहेमद या दोन विद्यार्थ्यांशी संपर्क होत नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -