घरमहाराष्ट्रनाशिकशुल्कवाढ रद्द करा, अन्यथा प्रवेश काढून घेऊ!

शुल्कवाढ रद्द करा, अन्यथा प्रवेश काढून घेऊ!

Subscribe

नाशिकमधील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचालित विद्या प्रबोधिनी शाळेने इयत्ता पाचवीसाठी २५ हजार रुपये शुल्क आकारण्यास पालकांनी तीव्र विरोध केला आहे.

नाशिकमधील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचालित विद्या प्रबोधिनी शाळेने इयत्ता पाचवीसाठी २५ हजार रुपये शुल्क आकारण्यास पालकांनी तीव्र विरोध केला आहे. शुल्कवाढ रद्द करा अन्यथा आम्ही आमच्या पाल्याचे प्रवेश काढून घेऊ, अशी ठोस भूमिका येथील पालकांनी घेतली आहे. शाळेविरोधात महापालिका प्रशासन अधिकार्‍यांकडे तक्रार करण्यात आली असून, विस्तार अधिकार्‍यांचा अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

सात वर्षांपूर्वी नर्सरीसाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी आता चौथी उत्तीर्ण होवून पाचवीत पोहोचले आहेत. चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रवेश पुढील शैक्षणिक वर्षात कायम होणे अभिप्रेत असताना शाळेनी प्रत्येक विद्यार्थ्याला दाखला दिला. पालकांची मागणी नसताना प्रत्येक दाखल्यासाठी शाळेनी शंभर रुपये आकारले आहेत. इयत्ता पाचवीत प्रविष्ठ होवू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांकडून २५ हजार रुपये शैक्षणिक शुल्काची मागणी केली. मूळात इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतचे शैक्षणिक शुल्क अवघे १७ हजार ७०० रुपये असताना इ.पाचवीसाठी थेट २५ हजार रुपयांची मागणी करणे नियमबाह्य असल्याचा आक्षेप पालकांनी घेतला. याशिवाय पालकांकडून दरवर्षी रजिस्टर शुल्क वसूल केले जाते. शाळेत ई-लर्निंगची व्यवस्था नसताना मागील काही वर्षांपासून त्याचेही शुल्क वसूल केले जात असल्याचे पालकांनी सांगितले. शुल्कवाढ व इतर काही शंकांबाबत विचारणा केली असता शाळेकडून कोणतेही उत्तर दिले जात नाही. एखाद्या पालकाने तक्रार केल्यास त्याच्या पाल्यास कोणत्याही स्पर्धेत सहभागी करून घेतले जात नसल्याचा आक्षेप पालकांनी घेतला आहे.

- Advertisement -

चौकशीसाठी सूचना केल्या

याप्रकरणी चौकशीसाठी विस्तार अधिकार्‍यांना सूचना केल्या आहेत. सविस्तर चौकशी करून विस्तारअधिकारी अहवाल सादर करणार असून, त्याप्रमाणे पुढील निर्णय घेतला जाईल. – उदय देवरे, महापालिका प्रशासन अधिकारी (शिक्षण विभाग)

हा कोणता न्याय?

पहिल्या वर्षी प्रवेशासाठी ९ हजार रुपये शुल्क होते. आता ते थेट २५ हजारांपर्यंत वाढले आहे. बससेवेसाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागते. शैक्षणिक शुल्कात थोड्याफार प्रमाणात वाढ होणे अपेक्षित होते. मात्र, सहावी ते दहावीपर्यंत १७ हजार ७०० रुपये आणि पाचवीसाठी २५ हजार रुपये हा कोणता न्याय झाला? – सुरेखा ताकाटे, पालक

पालकांचे आक्षेप

  • शिक्षकांमध्ये सातत्य नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो
  • सात वर्षापासून आमचे पाल्य या शाळेत शिक्षण घेतात. त्यांना अशा पध्दतीने त्रास देणे योग्य नाही
  • आम्ही सात वर्षात भरलेले शैक्षणिक शुल्क परत करा.
  • शाळेनी या प्रकरणी दखल न घेतल्यास पाल्याचे दाखले काढून घेण्याचे आव्हान
  • चित्रकला शिक्षकाने विद्यार्थ्यास मारहाण केली होती. त्याविषयी लेखी तक्रार केल्यानंतर मुखाध्यापकांनी पाच दिवसात कारवाईचे दिलेले आश्वासन फोल ठरले
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -