घरमहाराष्ट्रनाशिकपवारांना चिंता शहरी मतदानाची

पवारांना चिंता शहरी मतदानाची

Subscribe

नाशिक लोकसभा मतदारसंघातील नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघ राष्ट्रवादीला अनुकूल असल्याचा अहवाल राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी पक्षाध्यक्ष शरद पवारांना सादर केला असला, तरी शहरी मतदानाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.

लोकसभा मतदारसंघातील नाशिक व दिंडोरी मतदारसंघ राष्ट्रवादीला अनुकूल असल्याचा अहवाल राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी पक्षाध्यक्ष शरद पवारांना सादर केला असला, तरी शहरी मतदानाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. नाशिक येथे शरद पवार यांनी शुक्रवारी (दि.१७) दोन तासांच्या धावत्या दौर्‍यात निवडणूक निकालाबाबत पदाधिकार्‍यांशी चर्चा केली.

खासगी कामानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज नाशिक येथे आले होते. सकाळी ८ ते १० या दोन तासांच्या दौर्‍यात त्यांनी नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीसह लोकसभा निवडणूक निकालाचाही धावता आढावा घेतला. राज्यातील प्रमुख लढतींपैकी नाशिकचा राजकीय सामना हा हाय व्होल्टेज म्हणून बघितला जात आहे. या मतदारसंघात भुजबळ आणि सेनेचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे या दोघांनीही आपली ताकदपणाला लावली. गोडसे आणि कोकाटेंच्या रुपाने दोन मराठा उमेदवार रिंगणात असल्याने मराठा मतांचे विभाजन अटळ मानले जात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हक्काच्या मुस्लीम आणि दलित मतांवर वंचित बहुजन आघाडीचा पर्याय उभा राहिल्याने ही लढत अटीतटीची झाली. त्यामुळे हा विजय कुणालाही वाटतो, तितका सोपा नाही. राजकारणातील मुत्सद्दी नेते म्हणून परिचित असलेले पवार ही सर्व परिस्थिती जाणून आहेत. नाशिक येथे त्यांनी काही पदाधिकार्‍यांना गाडीत बसवून घेत त्यांच्याशी चर्चा केली. यंदा दोन्ही मतदारसंघ आपल्यासाठी अनुकूल आहेत, असे यावेळी पदाधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. पदाधिकार्‍यांनी मांडलेल्या या निवडणूक विवेचनावर काही क्षण विचार करत त्यांनी राष्ट्रवादीला ग्रामीण भागात चांगले मतदान झाले, हे खरे असले तरी शहरी मतदानाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. पदाधिकार्‍यांनी शहरातील तीन मतदारसंघांची आकडेवारी स्पष्ट करत हे मतदान आपल्याच पक्षाला कसे झाले हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. अखेर २३तारखेला बघुयात, असे सांगत पवारांनी निरोप घेतला.

- Advertisement -

दुष्काळाबाबत माहिती

लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर शरद पवारांनी दुष्काळ दौरा सुरू केला. खाजगी कारणानिमित्त आलेल्या पवारांनी या धावत्या दौर्‍यात पदाधिकार्‍यांकडून नाशिक जिल्ह्यातील चारा, पाण्याची व्यवस्था जाणून घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -