घरमहाराष्ट्रनाशिकशहरात आजपासून १५ ठिकाणी पे अ‍ॅन्ड पार्क

शहरात आजपासून १५ ठिकाणी पे अ‍ॅन्ड पार्क

Subscribe

प्रायोगिक तत्वावर दुचाकी, चारचाकी व सहाचाकी वाहनांसाठी पे अ‍ॅन्ड पार्क पार्किंग सुरू

शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित होण्यासाठी महापालिका स्मार्ट सिटी पार्किंग प्रोजेक्टनुसार ऑन स्ट्रीट १३ व ऑफ स्ट्रीट २ असे एकूण १५ ठिकाणी प्रायोगिक तत्वावर दुचाकी, चारचाकी व सहाचाकी वाहनांसाठी पे अ‍ॅन्ड पार्क पार्किंग सुरु केले आहे. यासंदर्भात पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी पार्किंग ठिकाणांची वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे.

शहरात वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतूककोंडी होऊ लागली आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क केल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. पे अ‍ॅन्ड पार्किंगची गुरुवार, दि. ४ जुलैपासून अंमलबजावणी केली जाणार आहे. ऑन स्ट्रीट पार्किंगच्या ठिकाणीच वाहनचालकांनी वाहने पार्क करावीत. रस्त्याच्या दुसर्‍या बाजूस वाहने पार्क करू नयेत. दुसर्‍या ठिकाणी वाहने पार्क केल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई केली जाणार आहे.

- Advertisement -

                                 या ठिकाणी करता येईल पार्किंग

smart city parking

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -