घरमहाराष्ट्रनाशिकविनामास्क बाहेर गेल्यास खिसा होईल रिकामा

विनामास्क बाहेर गेल्यास खिसा होईल रिकामा

Subscribe

नाशिक शहरातील ९१ बेशिस्त नागरिकांना कोर्टाने बजावले समन्स, ५६ हजारांचा दंड

कोरोना काळात वारंवार आवाहन करुनही विनामास्क फिरणार्‍या, सोशल डिस्टन्सिंच्या नियमांचं पालन न करणार्‍या आणि रस्त्यावर थुंकणार्‍या ९१ बेशिस्त नागरिकांना कोर्टानं आज समन्स बजावत ५६ हजारांचा दंड ठोठावला.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मास्क वापर अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये आणि रस्त्यावर थुंकू नये, या नियमांचे बेशिस्त नागरिकांकडून उल्लंघन होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या नागरिकांवर आपत्ती कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. या मोहीमेंतर्गत न्यायालयाने ७५ नागरिकांना ६५० रुपयांचा दंड ठोठावला. यात महाराष्ट्र पोलीस कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ८७ जणांना न्यायालयाने ५४ हजार ७५० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. उर्वरित दोघांना २ हजार रुपयांचा दंड ठोठावला. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी टी. एन. कादरी, पी. ए. राजपूत, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, ए. एन. सरख, यांच्या न्यायालयात दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -