Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र नाशिक लोक निवडणुकीची वाट बघत आहेत जोडे मारण्यासाठी; श्रीकात शिंदे प्रकरणी राऊतांचा टोला

लोक निवडणुकीची वाट बघत आहेत जोडे मारण्यासाठी; श्रीकात शिंदे प्रकरणी राऊतांचा टोला

Subscribe

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. shrikant shinde) यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आल्यावर खासदार संजय राऊत माध्यमांसमोरच थुंकले. त्यांचा थुंकण्याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. संजय राऊतांच्या या कृतीमुळे शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला असून राऊतांविरुद्ध ‘जोडे मारो’ आंदोलन करणार आहे. याप्रकरणी संजय राऊतांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, लोकांनी त्यांना वर्षभरामध्ये इतके जोडे मारलेत आणि लोक निवडणुकीची वाट बघत आहेत त्यांना जोडे मारण्यासाठी. (sanjay raut say, People are waiting for elections to pair up)

संजय राऊत सध्या त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना शिंदे गटाकडून राज्यभर होणाऱ्या ‘जोडे मारो’ आंदोलनाकडे कशापद्धतीने बघता असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, कशाकरता बघायचं. त्यांना ना काम ना धंदा, ना कार्यकर्ते. कशाकरता जोडे मारत आहेत काय माहिती? लोकांनी त्यांना वर्षभरामध्ये इतके जोडे मारलेत आणि लोक निवडणुकीची वाट बघत आहेत त्यांना जोडे मारण्यासाठी. त्यांचा जो काही टाईमपास चालला आहे तो चालू दे.

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले की, लोकशाही आहे. आपल्या भावना व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार आहे. पण हे भावना शून्य लोक आहेत. ज्या पद्धतीने यांनी शिवसेनेशी बेईमानी केली, ठाकरे कुटुंबाशी बेईमानी केली यांना काय अधिकार आहे दुसऱ्यांना जोडे मारण्याचा. यांनी ते जोडे स्वत:लाच मारून घेतले पाहिजेत. जोडे मारावे असे काय केले आहे आम्ही. विषय समजून घेत नाही, बिनडोक लोकं आहेत ही, पण आनंद आहे आजच्या दिवशी त्यांना काहीतरी काम मिळाले आहे. त्यांना चांगली प्रसिद्धी द्या. लोकांना कळू द्या हे किती बेईमान लोक आहेत. जास्तीत जास्त लोकांना समजली पाहिजे यांची बेईमानी. अशा जोडे मारण्याच्या कार्यक्रमाला खऱ्या शिवसेनेवर काही परिणाम होत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -