घरमहाराष्ट्रनाशिकडेंग्यू ,चिकुनगुनिया वाढण्यास पेस्ट कंट्रोल ठेकेदारच जबाबदार

डेंग्यू ,चिकुनगुनिया वाढण्यास पेस्ट कंट्रोल ठेकेदारच जबाबदार

Subscribe

महापौर सतीश कुलकर्णी यांचा ठपका; आठ दिवसांत साथ नियंत्रणाचे आदेश

शहरातील डेंग्यू ,चिकुनगुनियासह साथीच्या आजारांना पेस्ट कंट्रोलचा ठेकेदार कारणीभूत असल्याचा ठपका महापौर सतीश कुलकर्णी यांनी ठेवला असून, संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. येत्या आठ दिवसांत शहरातील डेंग्यू, चिकुनगुनियाची साथ नियंत्रित करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.विभागीय अधिकार्‍यांनी सकाळी आठ ते अकरा या वेळेत प्रभागांना भेटी देऊन पाहणी करावी, अशा सूचना कुलकर्णी यांनी दिल्या.

भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदेंना डेंग्यूची लागण झाली असून, त्यांनीही आरोग्य विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. डेंग्यू,चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर सतीश कुलकर्णी यांनी विभाग प्रमुखांची बैठक बोलावली. त्यास अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, उपायुक्त करुणा डहाळे, अर्चना तांबे, अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी , शहर अभियंता नितीन वंजारी, कार्यकारी अभियंता संजय घुगे, चंद्रशेखर आहेर, बाजीराव माळी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख डॉ. आवेश पलोड आदी उपस्थित होते.

महापौरांच्या सूचना

  • पेस्ट कंट्रोल ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी.
  • पाणी साचणार्‍या ठिकाणी संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी.
  • अर्धवट बांधकाम झालेल्या व जुन्या इमारतींची तपासणी करा.
  • समाजमंदीर, व्यायामशाळा, अभ्यासिका आदी इमारतींचे आउटलेट तपासावे.
  • स्मार्ट सिटीच्या कामात उघड्या पडलेल्या गटारी बंदिस्त कराव्यात.
  • तुटलेले चेंबर, ढापे दुरुस्त करा.
  • गोठ्यांमधील मलमूत्राची लाइन पालिकेला जोडली असल्यास कारवाई करावी.
  • मोकळे भूखंड स्वच्छ करा.

डेंग्यू, चिकुनगुनियाच्या रुग्णवाढीला सर्वच विभाग जबाबदार आहेत. पेस्ट कंट्रोलच्या ठेकेदाराचे काम असमाधानकारक असून, त्याच्यावर दंडात्मक कारवाई करायला हवी. आठ दिवसांत डेंग्यू, चिकुनुगनिया नियंत्रणात आला पाहिजे.
– सतीश कुलकर्णी, महापौर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -