घरताज्या घडामोडीआजपासुन पेट्रोलपंप पुर्ववत

आजपासुन पेट्रोलपंप पुर्ववत

Subscribe

असोसिएशनचा निर्णय ः कंटेनमेंट परिसरातील पंप मात्र बंदच राहणार

नाशिक

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात जमावबंदीचे आदेश दिल्यानंतर अनेक ठिकाणी वाहनांची तसेच नागरिकांची गर्दी होत असल्याने नाशिकमध्ये पेट्रोल पंपावरही निर्बंध घालण्यात आले होते. नाशिक जिल्हा पेट्रोल असोसिएशननेही सकाळी ८ ते ५ या वेळेत पंप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सोमवारपासून लॉकडाउनचे निकष शिथिल केल्याने कंनटेनमेंट झोन व मालेगाव वगळता जिल्हयातील सर्व पेट्रोल पंप मंगळवार (दि. २२) पासून पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याचे नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे सचिव सुदर्शन पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र या काळात शहरात नागरीकांची वर्दळ दिसू लागल्याने पेट्रोल पंपांवरही काही निर्बंध टाकण्यात आले. नाशिक शहरात एकदा एकावेळी दुचाकीसाठी फक्त १०० रुपयांचे तर चार चाकी वाहनांना केवळ १ हजार रुपयांचे इंधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर निर्धारित वेळेत केवळ अत्यावश्यक सेवानांच इंधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या पेट्रोल पंप धारकांवर भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेश काढण्यात आले. नागरिकांनी किराणा, दुध, भाजीपाला व औषधे आदि जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी शक्यतो वाहनाचा वापर करू नये. अशावेळी शक्यतो जवळच्या ठिकाणाहून वस्तू खरेदी कराव्यात असे आवाहन करण्यात आले. तर निर्धारित वेळेत केवळ अत्यावश्यक सेवानांच इंधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिक जिल्हयात गेल्या महीनाभरापासून सर्व पेट्रोल पंप हे सकाळी ८ ते ५ या वेळेतच सुरू ठेवण्यात येत आहेत. मात्र सोमवारपासून हॉटस्पॉट नसलेल्या शहरांमध्ये लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केल्याने उद्योग, व्यवसाय सुरू होत आहेत. तसेच मालवाहतुकही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता इंधनाची वाढती मागणी लक्षात घेता पेट्रोल डिलर्स असोसिएशननेही मंगळवार (दि. २२) पासून पेट्रोल पंप पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

शासनाने लॉकडाउनचे नियम शिथिल केले आहे. त्यामुळे कारखानेही सुरू झाले आहेत. मालवाहतुकीसही परवानगी देण्यात आल्याने सहाजिकच इंधनाची मागणीही वाढणार आहे. अनेक पेट्रोल पंप हे महामार्गावर आहेत त्यामुळे असोसिएशनने मंगळवारपासून सर्व पेट्रोल पंप हे पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून मालेगाव, नामपूर आणि कंटेनमेंट झोनमधील पेट्रोल पंप वगळण्यात आले आहेत.

- Advertisement -

सुदर्शन पाटील, सचिव,

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -