घरताज्या घडामोडीइंस्टाग्रामवर फोटो व्हायरल करणे पडले महागात;महिलेचा ऑनलाईन विनयभंग

इंस्टाग्रामवर फोटो व्हायरल करणे पडले महागात;महिलेचा ऑनलाईन विनयभंग

Subscribe

स्व:ताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणे एका महिलेस महागात पडले आहे. हायटेक भामट्याने इंस्टाग्रामवर डाऊनलोड केलेले फोटोंचा गैरवापर करीत अश्लिल फोटो पुन्हा इंटाग्रामवर टाकून महिलेची बदनामी केली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शहरातील एका महिलेने काही दिवसांपूर्वी स्वत:चे छायाचित्र इंन्टाग्रामवर अपलोड केले होते. १८ मार्च रोजी भामट्याने इंस्टाग्रामवरील महिलेचे फोटो कॉपी करून त्यावर अश्लिल शेरेबाजी केली. प्रोफाईलचा वापर करत युआयएलच्या माध्यमातून ते फोटो बदनामीच्या उद्देशाने व्हायरल केले. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी करत आहेत.

टिकटॉक व्हिडीओ बनविल्याने एकावर हल्ला

टिकटॉकसाठी व्हिडीओ तयार करणार्‍यावर दोनजणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना औद्योगिक वसाहतीतील डिजीपीनगर भागात घडली. याप्रकरणी सौरभ राजू सोनवणे (२०, रा.गौरव कॉलनी,सिडको) यांनी अंबड पोलीस तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. वैभव लोखंडे आणि मोन्या पाटोळे (दोघेही रा.अंबड) अशी प्राणघातक हल्ला करणार्‍या संशयितांची नावे आहेत.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, सौरव सोनवणे हा बुधवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास डीजीपीनगर येथील वाघमळा भागात गेला होता. एका ठिकाणी उभा राहून तो टिकटॉकसाठी स्व:ताचा व्हिडीओ तयार करत होता. त्यावेळी दोघेजण त्या ठिकाणी आले. कोणतेही कारण नसताना दोघांनी त्यास बेदम मारहाण करत त्याच्या डोक्यावर कोयत्याने वार केला. या घटनेत सौरभ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बेडवाल करत आहेत.

शाळेतून संगणक लंपास

शिंदे (ता.नाशिक) येथील प्राथमिक शाळेतून चोरट्यांनी संगणक लंपास केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र भिकाजी तडवी (रा.शिवरामनगर,जेलरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रविंद्र तडवी शिंदे शाळेचे शिक्षक आहे. शाळेला सुट्या असल्याची संधी साधत चोरट्यांनी १८ मार्च ते २ एप्रिल दरम्यान इयत्ता ६ वीच्या वर्गाचे कुलूप तोडून शाळेतील संगणक संच चोरून नेला. पुढील तपास हवालदार जाधव करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -