घरमहाराष्ट्रनाशिकपिंपळगावला २७ दिवसांत कांदा विक्रीतून १२६ कोटींची उलाढाल

पिंपळगावला २७ दिवसांत कांदा विक्रीतून १२६ कोटींची उलाढाल

Subscribe

शेतकर्‍यांना दिलासा

 कोरोना संक्रमण काही प्रमाणात कमी झाल्यानंतर २४ मे पासून नाशिक जिल्ह्यातील १७ बाजार समिती ह्या पूर्ववत सुरू झाल्या. यामध्ये पिंपळगाव बाजार समितीत प्रामुख्याने कांदा विक्रीतून २४ मे ते २१ जून या दरम्यान १२६ कोटीची उलाढाल झाली आहे. तर ७ लाख ३३ हजार ६२२ क्विंटल कांदा विक्री करण्यात आली आहे.

कांदा उत्पादक शेतकर्‍यांना सरासरी २००० रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त २६०० रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. एकीकडे शेतकर्‍यांसह सर्वजण आर्थिक संकटात सापडलेले असताना कांदा या आर्थिक पिकाला कोरोना काळातही चांगला बाजार भाव मिळाल्यामुळे पावसाळ्यातील शेतीला लागणार्‍या भांडवलाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. कोरोना काळातही उत्तम नियोजन व्यापारी वर्गाची उपस्थिती संपूर्ण परिसर सॅनिटायझर करणे शेतकर्‍यांचा कोरोना टेस्ट घेऊन योग्य ती काळजी घेणे, या सर्व बाबींवर सभापती दिलीपर बनकर व बाजार समिती कर्मचारी यांनी योग्य लक्ष घालून नियोजन केल्यामुळे पिंपळगावच्या शंभर एकरच्या बाजार समितीत मोठ्या प्रमाणात शेतकरी कांदा विक्रीला घेऊन आले.

- Advertisement -

या कांदा उत्पादक शेतकर्‍यांना योग्य तो बाजार भाव मिळाला परिणामी बाजार समितीच्या आर्थिक उलाढालीत मोठी वाढ होऊन तब्बल १२६ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. आतापर्यंत २३ ते २५ हजार वाहनांमधून या बाजार समितीत जीप, ट्रॅक्टरमधून कांदा विक्रीसाठी आलेला आहे. पिंपळगाव बाजार समितीत कांद्याला योग्य बाजार भाव बरोबर चोख पेमेंट मिळत असल्याने सत्तर ते शंभर किलोमीटर वरून शेतकरी कांदा विक्रीसाठी घेऊन येत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -