घरताज्या घडामोडीमद्यधुंद जवानांकडून पोलिसाचे अपहरण

मद्यधुंद जवानांकडून पोलिसाचे अपहरण

Subscribe

कर्तव्य बजावणार्‍या पोलिसाचे मद्यधुंद दोन जवानांनी कारमधून अपहरण केल्याची घटना शुक्रवारी (दि.१७) मध्यरात्री १ वाजेदरम्यान खडकाळी सिग्नल, भद्रकाली येथे घडली. पोलिसाने प्रसंगावधान राखवत वायरलेसवर शहर पोलिसांना आपबिती सांगितली असता पोलिसांनी नाकाबंदी करत दोघांच्या तावडीतून त्यांची सुखरुप सुटक केली. याप्रकरणी पोलीस शिपाई दीपक सखाराम पाटील यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांना दोघांना अटक केली आहे. सेवानिवृत्त सुभेदार रोहित प्रल्हाद दापुरकर (४३, रा. हिरावाडी), सुभेदार मन्ना डे (४३, रा.स्कूल ऑफ आर्टिलरी, देवळाली, मूळ रा.पश्चिम बंगाल) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, पोलीस शिपाई दीपक पाटील हे सहकार्‍यासोबत शुक्रवारी मध्यरात्री खडकाळी सिग्नलवर कर्तव्य बजावत होते. त्यावेळी पोलिसांना मद्यधुंद अवस्थेत रोहित दापुरकर व मन्ना डे आढळून आले. पोलिसांनी दोघांना विचारणा केली असता त्यांनी पाटीलांसोबत असलेल्या कर्मचार्‍यास मारहाण केली. याप्रकरणी पाटील दोघांना भद्रकाली पोलीस ठाण्यात चला, असे सांगितले असता दोघांनी कार (जे.एच.०१, सीजी २६९८)च्या मागील सीटावर बसण्यास सांगितले. पाटील कारमध्ये बसले असता कार भद्रकाली पोलीस ठाण्याच्या दिशेने न नेता देवळाली कॅम्पच्या दिशेने नेली. ही बाब पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी वायरलेसवर शहर पोलिसांना आपबिती सांगितले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून शहरात नाकाबंदी केली. संशयित कार अडवत ओलिसांनी पाटीलांची सुटका करत मद्यपी दोघांना अटक भद्रकाली पोलीस ठाण्यात आणले.

दोघांना कोठडी

अटक केलेले दोघे लष्कराचे जवान आहेत. घटनास्थळी ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळून आले आहेत. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

- Advertisement -

साजन सोनवणे

वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भद्रकाली पोलीस ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -