घरमहाराष्ट्रनाशिकविद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचा पुरवठा करणार्‍या दोघांना अटक

विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचा पुरवठा करणार्‍या दोघांना अटक

Subscribe

चार ग्रॅम मेफेड्रॉन पावडर जप्त; शहर पोलिसांची कारवाई

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचा पुरवठा करणार्‍या दोघांना शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून चार ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) आणि इतर वस्तू असा ३८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सोहिल शरफोद्दीन पठाण (२१, रा. भद्रकाली), नवाज रियाज सय्यद (१९, रा. मुंबईनाका) अशी संशयितांची नावे आहेत. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत गोपनीय माहितीच्या आधारे अंमली पदार्थांचा अवैध व्यवसाय करणार्‍याविरुद्ध कारवाईच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी साध्या वेशात तपास सुरू केला आहे. तपासादरम्यान बुधवारी (दि.१६) पोलीस उपनिरीक्षक महेश हिरे यांना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची नशा करण्याचे व्यसन लागले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक हिरे व महेश शिंदे यांनी चौकशीसाठी एका व्यसनाधीन विद्यार्थ्याला प्रमोद महाजन गार्डन परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दोघांची नावे सांगितली. हे दोघे संगनमताने मेफेड्रॉन विक्रीसाठी आले असता त्यांना मायको सर्कलवरील बीएसएनएल कार्यालयासमोर पोलिसांनी अटक केली. त्यांची झडती घेतली असता चार ग्रॅम मेफेड्रॉन व इतर वस्तू असा एकूण ३८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -